शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

आदित्य ठाकरेंसोबतच उद्धव ठाकरेंकडून आणखी एका युवा नेत्याचं कौतुक; जाणून घ्या 'तो' कोण आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 11:00 IST

Maharashtra Election 2019 आदित्य ठाकरेंसोबत 'त्या' खासदाराचं उद्धव यांच्याकडून कौतुक

मुंबई: यंदाची विधानसभा निवडणूक ठाकरे घराण्यासाठी ऐतिहासिक आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकीपासून कायम दूर राहणाऱ्या ठाकरे कुटुंबातील आदित्य वरळीतून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. उद्धव यांनी आदित्य यांच्यासोबतच शिवसेनेच्या एका खासदारावरही स्तुतीसुमनं उधळली.आदित्य ठाकरेंना शिवसैनिकांवर लादण्यात आलेलं नाही. तर त्यांना शिवसैनिकांना प्रेमानं स्वीकारलं असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 'आदित्य ठाकरेंनाशिवसेनाप्रमुखांकडूनच बाळकडू मिळालंय. मी जेव्हा कार्य सुरू केलं, तेव्हा आदित्य खूप लहान होता. तो सतत आज्याभोवती असायचा. त्यांच्याकडे बसून बाळासाहेब कोणाशी काय, कसं बोलतात ते ऐकायचा. हे सगळं करत करत तो मोठा झाला. वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापासून तो माझ्यासोबत आणि बाळासाहेबांसोबत निवडणुकीच्या दौऱ्यांवरसुद्धा यायला लागला. माझ्यासोबत त्यानं ग्रामीण भाग पाहिला आहे. आतासुद्धा त्यानं 'जनआशीर्वाद यात्रे'च्या माध्यमातून शंभर-सव्वाशे मतदारसंघ पालथे घालतेत,' अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी आदित्य यांचं कौतुक केलं.शिवसेनेतील युवाशक्तीवर बोलताना उद्धव यांनी आणखी एका तरुण खासदाराचा आवर्जून उल्लेख केला. 'तुम्ही युवाशक्तीला कधी संधी देणार आहात? केवळ माझा मुलगा म्हणून मी हे बोलत नाही. पण हातकणंगलेचा खासदार धैर्यशील मानेचं उदाहरण घ्या. किती छान वाटतो. बोलतो चांगला. तडफदार आहे. तरुण आहे,' अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी मानेंची स्तुती केली. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींचा जवळपास लाखभर मतांनी पराभव केला. २००९ आणि २०१४ मध्ये शेट्टींनी हातकणंगलेमधून विजय मिळवला होता. मात्र माने यांनी २०१९ मध्ये शेट्टींचा पराभव करत त्यांची हॅट्ट्रिक रोखली. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाRaju Shettyराजू शेट्टी