शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 1:10 PM

नाशिक मर्चंट बँकेत घडलेल्या या प्रकाराने नाशिकमध्ये गोंधळ माजला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी हे पैसे कुठून, कुणाकडून कसे आले याचा शोध आता घेतला आहे. 

नाशिक - राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं जोरदार वाहत आहे. त्यात राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहचला आहे. निवडणुकीच्या काळात भरारी पथकाकडून ठिकठिकाणी नाकेबंदी लावून तपासणी केली जाते. त्यात बेकायदेशीर दारुसाठा, कोट्यवधीच्या रोकड जप्त झाल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. परंतु नाशिकमध्ये घडलेल्या प्रकाराने सगळेच हैराण झाले आहेत. 

नाशिकमध्ये बेरोजगार तरुणांच्या खात्यात १२५ कोटी रुपये जमा झाल्याचा प्रकार घडला आहे. नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत १२ खात्यांमध्ये एवढी मोठी रक्कम जमा झाली आहे. अचानकपणे खात्यात आलेल्या रक्कमेमुळे तरुणही गोंधळात पडले आहेत. खात्यात हे पैसे कुणी टाकले याबाबत तरुणांना कुठलीच कल्पना नाही. मात्र ऐन निवडणुकीच्या काळात घडलेल्या या प्रकारामुळे अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. काही तरुणांनी स्थानिक नेते मंत्री दादा भुसे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर या प्रकरणाची पोलीस तपास करत आहेत. 

१२५ कोटी इतकी रक्कम बनावट कंपन्यांचा आर्थिक व्यवहार आहे का अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे नाशिकच्या मालेगावमध्ये खळबळ माजली आहे. गेल्या १५-२० दिवसांत बँकेच्या शाखेत १२ खात्यांमध्ये शंभर ते सव्वाशे कोटी आर्थिक व्यवहार झाला आहे. या तरुणांच्या नावाने बनावट कंपन्या तयार करून कुणाच्या नावे १० तर कुणाच्या नावे १५ कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सिराज अहमद या व्यक्तीने या तरुणांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, सह्या घेत मालेगाव बाजार समितीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कागदपत्रे घेतली होती. त्यानंतर हा प्रकार घडल्याचे समोर आले.

या १२ तरुणांनी मंत्री दादा भुसे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणत तपासाला सुरुवात झाली. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यावर अपर पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्यात आली असून ही रक्कम कुठून आली, त्यामागे कोण होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत या खात्यांवरून १५ दिवसांत १०० कोटींहून अधिक आर्थिक उलाढाल होणे हे सगळे गौडबंगाल असल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nashik-central-acनाशिक मध्यmalegaon-central-acमालेगाव मध्यShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस