मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 03:09 PM2024-11-16T15:09:54+5:302024-11-16T15:10:54+5:30

निवडणुकीच्या राजकारणात महाराष्ट्रात व्होट जिहादचा मुद्दा तापला आहे. मौलाना सज्जाद नोमानी यांनी उमेदवारांची यादी देत मुस्लीम समाजाला त्यांना मत देण्याचे आवाहन केले आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 - All India Muslim Personal Law Board Spokesperson Maulana Sajjad Nomani Announces List of Candidates Supported | मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?

मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?

मुंबई - जर महाराष्ट्रात त्यांचा पराभव झाला तर दिल्लीतही त्यांचे सरकार फार काळ टिकणार नाही. आमचं टार्गेट केवळ महाराष्ट्र सरकार नाही तर दिल्लीची सत्ता आणि येणारा काळ आहे असं ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नोमानी यांनी सांगितले. त्याशिवाय महाराष्ट्रातील २६९ जागांवर नोमानी यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारांची यादी जारी केली आहे. त्यात बहुतांश महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. त्याशिवाय समाजवादी पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या काही उमेदवारांनाही ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने पाठिंबा दिला आहे. 

सज्जाद नोमानी म्हणाले की, महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांशी आम्हाला भेटायला संधी मिळाली. ते माझ्याकडे आले, आम्ही त्यांच्याकडून काही शब्द घेतलेत. त्यानंतर आम्ही एक यादी बनवली आहे. मी एका मुलाखतीत म्हटलं हा व्होट जिहाद कसा? ज्यांचे सरदार शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नाना पटोले आहेत असं ते म्हणाले. त्याशिवाय जर शत्रूला कुणी साथ देत असेल तर त्याला बायकॉट करा. लोकसभेच्या वेळी काहींनी भाजपाला मते दिली हे माहिती आहे, त्या मुसलमानांवर सामाजिक बहिष्कार टाकायला हवा असा इशाराही त्यांनी दिला आहे.  

व्होट जिहाद या मुद्द्यावरून भाजपा आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. एका विशिष्ट समाजाला एकगठ्ठा मतदान करण्याचं आवाहन मौलानांकडून केले जात आहे असा आरोप भाजपाने केला तर एखाद्या मतदारसंघात एखादा समाज जास्त असेल, पुण्याच्या विशिष्ट भागात हिंदू समाज आहे त्यांनी भाजपाला मतदान केले, तिथे असेच मतदान होते याचा अर्थ तो मी काही जिहाद समजत नाही. तिथल्या लोकांची विचारधारा आहे असं प्रत्युत्तर शरद पवारांनी दिले आहे. नोमानी यांच्या विधानानंतर महाराष्ट्रात व्होट जिहादचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मौलाना सज्जाद नोमानी यांनी पाठिंबा दिलेले मुंबईतील ३६ उमेदवार कोण?

बोरिवली - संजय भोसले (ठाकरे गट)

दहिसर - विनोद घोसाळकर (ठाकरे गट)

मागाठाणे - उदेश पाटेकर (ठाकरे गट)

मुलुंड - राकेश शेट्टी (काँग्रेस)

विक्रोळी - सुनील राऊत (ठाकरे गट)

भांडुप पश्चिम - रमेश कोरगावकर (ठाकरे गट)

जोगेश्वरी पूर्व - अनंत नर (ठाकरे गट)

दिंडोशी - सुनील प्रभू (ठाकरे गट)

कांदिवली पूर्व - काळू बुधेलिया (काँग्रेस)

चारकोप - यशवंत सिंह (काँग्रेस)

मालाड पश्चिम - अस्लम शेख (काँग्रेस)

गोरेगाव - समीर देसाई (ठाकरे गट)

वर्सोवा - हारून खान (ठाकरे गट)

अंधेरी पश्चिम - अशोक जाधव (काँग्रेस)

अंधेरी पूर्व - ऋतुजा लटके (ठाकरे गट)

विलेपार्ले - संदीप नाईक (ठाकरे गट)

चांदिवली - नसीम खान (काँग्रेस)

घाटकोपर पूर्व - राखी जाधव (राष्ट्रवादी शरद पवार)

घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव (ठाकरे गट)

मानखुर्द शिवाजी नगर - अबु आझमी ( समाजवादी पक्ष)

अणुशक्ती नगर - फहाद अहमद (राष्ट्रवादी शरद पवार)

चेंबूर - प्रकाश फातर्पेकर (ठाकरे गट)

कलिना - संजय पोतनीस (ठाकरे गट)

वांद्रे पूर्व - वरूण सरदेसाई (ठाकरे गट)

वांद्रे पश्चिम - असिफ झकारिया (काँग्रेस)

धारावी - ज्योती गायकवाड (काँग्रेस)

सायन कोळीवाडा - गणेश यादव (काँग्रेस)

वडाळा - श्रद्धा जाधव (ठाकरे गट)

माहिम - महेश सावंत (ठाकरे गट)

वरळी - आदित्य ठाकरे (ठाकरे गट)

शिवडी - अजय चौधरी (ठाकरे गट)

भायखळा - मनोज जामसुतकर (ठाकरे गट)

मलबार हिल - भैरूलाल चौधरी (ठाकरे गट)

मुंबादेवी - अमिन पटेल (काँग्रेस)

कुलाबा - हिरा देवासी (काँग्रेस)

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 - All India Muslim Personal Law Board Spokesperson Maulana Sajjad Nomani Announces List of Candidates Supported

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.