लातूरमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार सुधाकर श्रृंगारेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 16:11 IST2024-10-29T16:09:41+5:302024-10-29T16:11:15+5:30
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूर जिल्ह्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी भाजपाला रामराम ठोकला असून, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

लातूरमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार सुधाकर श्रृंगारेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लातूर जिल्ह्यामध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. येथील माजी खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी भाजपाला रामराम ठोकला असून, त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
लोककल्याणासाठी सदैव तत्पर! लातूरच्या विकासाला प्राधान्य देत, काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत, मा. दिलीपरावजी देशमुख व मा. अमितजी देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे, अशी माहिती सुधाकर श्रृंगारे यांनी पक्ष प्रवेशाची घोषणी करताना सोशल मीडियावरून दिली.
लोककल्याणासाठी सदैव तत्पर! लातूरच्या विकासाला प्राधान्य देत, काँग्रेस पक्षाच्या दूरदृष्टीवर विश्वास ठेवत, मा. दिलीपरावजी देशमुख व मा. अमितजी देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश.#CongressParty#Latur#AmitDeshmukh#DilipraojiDeshmukh#Maharashtra@AmitV_Deshmukhpic.twitter.com/6C7HDWyB3Z
— Sudhakar Shrangare (@mpsshrangare) October 29, 2024
सुधाकर शृंगारे यांनी २०१९ मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून निवडणूक लढवताना विजय मिळवला होता. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये सुधाकर शृंगारे यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यांना काँग्रेसच्या शिवाजीराव काळगे यांनी ६१ हजार ८८१ मतांनी पराभूत केले होते.