नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 04:39 PM2024-09-20T16:39:17+5:302024-09-20T17:57:46+5:30

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते अशोक चव्हाण यांचे नातेवाईक आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar ) यांनी त्यांच्या समर्थकांसह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Big blow to BJP in Nanded, Bhaskarrao Patil Khatgaonkar returns home to Congress with his supporters  | नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 

नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते अशोक चव्हाण यांचे नातेवाईक आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगांवकर यांनी त्यांच्या समर्थकांसह आज काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत भास्करराव पाटील खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि मीनल पाटील खतगावकर यांनीही पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, युवा नेत्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, नांदेड जिल्ह्यामधील नायगाव विधानसभा मतदारसंघातून मीनल पाटीलल खतगावकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडूंची तिसरी आघाडी विधानसभा निवडणुकीत महायुती, मविआला टक्कर देऊ शकेल का?

हो (528 votes)
नाही (1528 votes)
सांगता येत नाही (138 votes)

Total Votes: 2194

VOTEBack to voteView Results


 

माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार अशोक चव्हाण यांचे नातेवाईक आणि माजी खासदार भास्करराव खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने हा भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अलीकडेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये भाजपाचा पराभव झाला. अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानंतर भास्करराव खतगावकर, त्यांच्या सुनबाई मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह काँग्रेसच्या अनेकांनी भाजपाचे कमळ हाती घेतले होते. तरीही नांदेडमध्ये काँग्रेसचे खासदार निवडून आले होते. 

“भास्करराव पाटील खतगावकर हे तळागाळातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते पदाधिकारी व वरिष्ठ नेते यांच्याशी चर्चा करून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. टिळक भवनमध्ये पक्ष प्रवेश झाला असला तरी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य कार्यक्रम घेऊन पक्षप्रवेश सोहळा केला जाईल. भास्कराव पाटील खतगावकर यांच्या प्रवेशाने नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला आणखी बळ मिळेल व विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातूनही काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील”,असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.  

यावेळी बोलताना भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, काँग्रेस पक्षात प्रवेश करताना पुन्हा माझ्या घरी आल्याचा आनंद होत आहे. काँग्रेस पक्षाने आमदार, खासदार, मंत्रीपदावर काम करण्याची संधी दिली आहे. मध्यंतरी दुसऱ्या पक्षात गेलो होतो पण आता घरी आलो आहे. नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष राज्यात मजबूत होत असून विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे खतगावकर म्हणाले. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Big blow to BJP in Nanded, Bhaskarrao Patil Khatgaonkar returns home to Congress with his supporters 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.