शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 5:29 PM

Vinod Tawde Cash Distribution case: नालासोपाऱ्यातील एका हॉटेलमध्ये तावडे उपस्थित होते. तिथे पैसे वाटप केले जात असल्याचे आरोप करत बविआचे नेते क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचले होते.

मतदानाच्या आदल्या दिवशी नालासोपाऱ्यातील हॉटेलमध्ये बविआच्या नेत्यांनी भाजपाचे नेते विनोद तावडेंवर पैसे वाटप करत असल्याचे आरोप करत घेरले होते. हे नाट्य जवळपास दिवसभर सुरु होते. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी तावडेंवर टीका केली होती. या प्रकरणात तावडे यांनी कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्याची मागणी केली आहे. 

नालासोपाऱ्यातील एका हॉटेलमध्ये तावडे उपस्थित होते. तिथे पैसे वाटप केले जात असल्याचे आरोप करत बविआचे नेते क्षितीज ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते पोहोचले. यावेळी तावडेंच्या आजुबाजुच्या रुममधून दाव्यानुसार १९ लाख रुपये सापडले. तर तावडेंसोबत तेव्हा उपस्थित असलेले अनेक महिला, पुरुष यांना तिथून पोलिसांनी न तपासताच बाहेर काढले होते. तावडे या हॉटेलमध्ये ५ कोटी रुपये वाटण्यासाठी आले होते, असा दावा ठाकुर यांनी केला होता. 

पोलिसानी ही सापडलेली रक्कम ९ लाखांच्या वर असल्याचे म्हटले आहे. यानंतर तावडेंनी ठाकुरांना सोबत घेऊन पत्रकार परिषदही घेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच ते नंतर हितेंद्र ठाकुरांच्या गाडीतून निघूनही गेले होते. या प्रकरणात तीन गुन्हे दाखल झालेले आहेत. अशातच तावडे यांनी हे पैसे वाटपाचे दावे फेटाळले होते. आता तावडेंनी या प्रकरणात बदनामीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. 

तावडे यांनी या कायदेशीर नोटीसबाबत माहिती दिली आहे. मी एका सामान्य मध्यमवर्ग कुटुंबातून आहे. गेल्या ४० वर्षांपासून राजकारणात आहे. परंतू मी कशी असे काही केलेले नाही. काँग्रेसचे नेते मला, पक्षाला आणि माझ्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते यामुळे त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मुद्दामहून खोटे आरोप केले. यामुळे मी त्यांना नोटीस पाठविली असून त्यांनी सार्वजनिक रित्या माफी मागावी किंवा कारवाईला सामोरे यावे, असे यात म्हटले आहे. 

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेRahul Gandhiराहुल गांधीHitendra Thakurहितेंद्र ठाकूरBJPभाजपाSupriya Suleसुप्रिया सुळेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४