शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

माहिम मतदारसंघात अमित ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा?; देवेंद्र फडणवीसांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 2:51 PM

माहिम मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना तिकीट मिळालं आहे.

मुंबई - अमित ठाकरेंना मदत केली पाहिजे ही स्पष्ट भूमिका भारतीय जनता पार्टीची होती आणि आहे. राज ठाकरेंनी त्याठिकाणी मागील निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला मग एका जागेवर त्यांना मदत लागणार असेल तर दिली पाहिजे असं मोठं विधान भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. त्यामुळे माहिम मतदारसंघातील उमेदवारीवरून महायुतीत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. फडणवीसांआधी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनीही हीच भावना व्यक्त केली होती. 

आज देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य करत म्हटलंय की, अमित ठाकरेंना मदत करावी असं मत भाजपाचं होतं आणि आहे. मुख्यमंत्र्‍यांचेही मत त्यापेक्षा वेगळे नाही. मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे गेलो होतो. एखादी जागा अदलाबदल करून घेऊ असंही सांगितले. मुख्यमंत्र्‍यांनी तो प्रयत्न करून पाहिला. तिथले जे उमेदवार आहेत त्यांना बोलवून चर्चा केली पण त्यांच्या पक्षातील नेत्यांचे मत असं आहे, जर ते लढले नाहीत तर ती मते थेट उबाठाकडे जातील. त्यातून दोघांचे नुकसान होईल. त्यामुळे त्यांनी काही ऐकलं नाही असं फडणवीसांनी सांगितले.

पण अजूनही माझे स्पष्ट मत आहे, राज ठाकरे यांनी जी काही लोकसभेला मोदींसाठी मदत केली, त्यामुळे या एका जागेवर राज ठाकरेंना किंवा अमित ठाकरेंना समर्थन दिले पाहिजे असं भाजपाचं स्पष्ट मत आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांनी सांगितले. माहिम मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून महेश सावंत यांना तिकीट मिळालं आहे. त्यात मनसेकडून या मतदारसंघात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांना रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे इथल्या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेRaj Thackerayराज ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmahim-acमाहीमmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकBJPभाजपा