नवी दिल्ली - भारतीय जनता पार्टीकडून महाराष्ट्रातील उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत २५ उमेदवारांचा समावेश आहे. आतापर्यंत भाजपानं १४६ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. आजच्या यादीत विदर्भातील बहुतांश जागांचा समावेश करण्यात आला आहे.
तिसऱ्या यादीत कुणाला संधी?
मूर्तिजापूर - हरिश पिंपळेकारंजा - सई प्रकाश डहाकेतिवसा - राजेश वानखडेमोर्शी - उमेश यावलकरआर्वी - सुमित वानखेडेकाटोल - चरणसिंग ठाकूरसावनेर - आशिष देशमुखनागपूर मध्य - प्रवीण दटकेनागपूर पश्चिम - सुधाकर कोहलेनागपूर उत्तर - मिलिंद मानेसाकोली - अविनाश ब्राह्मणकरचंद्रपूर - किशोर जोरगेवारआर्णी - राजू तोडसामउमरखेड - किशन वानखेडेदेगळूर - जितेश अंतापूरकरडहाणू - विनोद मेढावसई - स्नेहा दुबेबोरिवली - संजय उपाध्यायवर्सोवा - भारती लव्हेकरघाटकोपर पूर्व - पराग शाहआष्टी - सुरेश धसलातूर शहर - अर्चना पाटील चाकूरकरमाळशिरस - राम सातपुतेकराड उत्तर - मनोज घोरपडेपलूस कडेगाव - संग्राम देशमुख
भाजपानं तिसऱ्या यादीत बोरिवलीचे आमदार सुनील राणेंचा पत्ता कट केला आहे. त्यांच्याऐवजी संजय उपाध्याय यांना भाजपाने उमेदवारी दिली. तर वर्सोव्यातून भारती लव्हेकर यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे. घाटकोपरमधूनही पराग शाह यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. काटोलमधून इच्छुक असणारे आशिष देशमुख यांना सावनेर मतदारसंघातून उतरवण्यात आले आहे.