शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 10:09 AM

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय मतदारांची मते पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खास योजना आखली आहे.

- चंद्रशेखर बर्वे  नवी दिल्ली - महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीय मतदारांची मते पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने खास योजना आखली आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषक राज्यांसह इतर राज्यांतीलही नागरिक मोठ्या प्रमाणावर राहतात. सूत्रानुसार, भाजपने महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांची राज्ये आणि भाषानिहाय डेटा बॅंक तयार करून त्यावर काम करायला सुरुवात केली आहे. 

राज्यात उत्तर भारतीयांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्यात केवळ उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांचा समावेश नसून मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड या सर्व राज्यांतील नागरिकांचाही समावेश आहे. या सर्वांची बोलीभाषा वेगळी आहे. शिवाय गुजरात, केरळ, तामिळनाडू, ओडिशा, पश्चिम बंगाल आदी राज्यांतील नागरिकांची संख्या सुद्धा खूप आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचा या नागरिकांवर फोकस राहणार आहे. 

राज्य आणि भाषेनुसार पक्षाच्या नेत्यांना प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नेत्यांना त्यांच्या राज्यातील मतदारांमध्ये प्रचार करण्यास सांगण्यात आले आहे. उत्तर भारतीय भोजपुरी, अवधी, बंजारी, ब्रिजभाषा, बिष्णोई, छत्तीसगडी, गढवाली, हरयाणवी, लोधी, राजस्थानी, लंबांडी अशा विविध भाषा बोलतात. या भाषा बोलणाऱ्या नेत्यांना प्रचारासाठी महाराष्ट्रात जाण्यास सांगण्यात आले आहे. महाराष्ट्रात सव्वा कोटीच्यावर हिंदी भाषक राहतात. महाराष्ट्रातील गुजराती, केरळी, तामिळनाडू, ओडिशा, बंगाली आदी राज्यांतील मतदारांची मते मिळविण्यासाठी त्या त्या राज्यांतील नेत्यांना सांगण्यात आले आहे. 

या नेत्यांवर दिली जबाबदारी विहिंपचे प्रवक्ते श्रीराज नायर यांच्यानुसार, मुंबईतील डोंबिवली म्हणजे मिनी केरळ. राज्यात अंदाजे २५ लाख मल्याळी नागरिक राहतात. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांना मोहिमेवर पाठविले आहे. युवा आघाडीचे प्रमुख खासदार तेजस्वी सूर्या आणि महिला आघाडीच्या प्रमुख वानती श्रीनिवासन हेही त्यांच्या राज्यांतील लोकांमध्ये प्रचारासाठी जाणार आहेत. भाजपने याच युक्तीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची ओडिशातील २४ वर्षांची सत्ता उलथवून लावली होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाMahayutiमहायुती