चंद्रशेखर बावनकुळेंनी दंड थोपटले, काँग्रेसला चमत्काराची आस

By योगेश पांडे | Published: November 7, 2024 06:34 AM2024-11-07T06:34:00+5:302024-11-07T06:35:57+5:30

Maharashtra Assembly Election 2024: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडणूक रिंगणातील घरवापसीमुळे कामठी मतदारसंघाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. २००४ पासून ही जागा भाजपकडेच असली तरी लोकसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे भाजपसमोर आव्हान आहे.

Maharashtra Assembly Election 2024: Chandrasekhar Bawankule imposed penalty, Congress hopes for a miracle | चंद्रशेखर बावनकुळेंनी दंड थोपटले, काँग्रेसला चमत्काराची आस

चंद्रशेखर बावनकुळेंनी दंड थोपटले, काँग्रेसला चमत्काराची आस

- योगेश पांडे
नागपूर -  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवडणूक रिंगणातील घरवापसीमुळे कामठी मतदारसंघाकडे राज्यातील राजकीय वर्तुळाच्या नजरा आहेत. २००४ पासून ही जागा भाजपकडेच असली तरी लोकसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे भाजपसमोर आव्हान आहे. तर लोकसभेसारखेच मताधिक्य मिळविण्यासाठी काँग्रेसकडून पूर्ण दम लावण्यात येत आहे.

या मतदारसंघात एकूण १९ उमेदवार उभे आहेत. बावनकुळेंनी २००४, २००९ व २०१४ च्या निवडणुकीत येथून विजयाची हॅटट्रिक लगावली होती व याच्याच भरवशावर त्यांना राज्याचे ऊर्जामंत्रिपद मिळाले होते. मात्र २०१९ मध्ये अनपेक्षितपणे त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली. सावरकर यांना ११ हजार १३६ मतांनीच विजय मिळवता आला होता. २०१४ च्या मताधिक्य तुलनेत ७० टक्क्यांहून अधिक घटले होते. यावेळी सर्वेक्षणाच्या आधारे कामठीच्या विधानसभेत पक्षाने परत बावनकुळे यांच्यावरच विश्वास टाकला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून परत सुरेश भोयर यांनाच उमेदवारी मिळाली. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे
- अनुसूचित जाती, मुस्लीम आणि बहुजन मतदारांची ताकद ज्यांच्यासोबतअसेल तोच यावेळी कामठीत मैदान मारेल हे निश्चित आहे.
- मतदारसंघात मुस्लीम मतदारांची लक्षणीय संख्या असून १९ पैकी सहा उमेदवार या समाजाचे आहेत. त्यामुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे.
-कामठी मतदारसंघात बेसा, हुडकेश्वर, पिपळा, नरसाळा, बहादुरा हा शहराच्या सीमेवरील भागदेखील येतो व येथील सव्वा लाखावर मतदार आहेत. शहरी भागाशी कनेक्ट करण्याचे नेते-पदाधिकाऱ्यांसमोर आव्हान.
-राज्य व केंद्र शासनाच्या योजनांच्या भरवशावर प्रत्येक गावात भाजपकडून गृहसंपर्कावर भर, तर बेरोजगारी, उद्योगांचा अभाव हे महाविकास आघाडीचे प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: Chandrasekhar Bawankule imposed penalty, Congress hopes for a miracle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.