काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 05:36 AM2024-10-28T05:36:05+5:302024-10-28T05:37:00+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : या यादीनुसार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्यात आली असून त्यांच्या ऐवजी या मतदारसंघातील गतवेळचे उमेदवार अशोक जाधव यांनाच पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : Congress changed candidates from Aurangabad East, Andheri West; The fourth list for the Legislative Assembly has been announced | काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर

काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने रविवारी रात्री आपल्या १४ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. त्यामुळे आतापर्यंत काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची संख्या ९९ इतकी झाली आहे.

या यादीनुसार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्यात आली असून त्यांच्या ऐवजी या मतदारसंघातील गतवेळचे उमेदवार अशोक जाधव यांनाच पुन्हा एकदा काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून जाहीर केलेल्या मधुकर देशमुख यांच्या जागी लहू शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सावंत हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून इच्छुक होते, परंतु त्यांना अंधेरी पश्चिममधून तिकीट जाहीर झाल्याने त्यांनी उमेदवारी नाकारली होती. त्यानंतर काँग्रेसने हा बदल केला आहे. सोलापूर दक्षिणमधून दिलीप माने, पंढरपूरमधून माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Congress changed candidates from Aurangabad East, Andheri West; The fourth list for the Legislative Assembly has been announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.