महाविकास आघाडीचा मुंबईतील फॉर्म्युला ठरला? ३-२-१ असे होणार जागावाटप? कोण-कुठे लढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 11:13 AM2024-08-22T11:13:52+5:302024-08-22T11:15:31+5:30

Maha Vikas Aghadi Seat Sharing For Mumbai In Maharashtra Assembly Election 2024: जागावाटपाबाबत चिंता करू नये. कोणत्याही पक्षाला तिकीट मिळाले तरी आपली सत्ता यावी, यासाठी उर्वरित दोघांना काम करावे लागणार, असे महाविकास आघाडीतील नेते सांगत असल्याचे म्हटले जात आहे.

maharashtra assembly election 2024 congress sharad pawar ncp uddhav thackeray shiv sena maha vikas aghadi seat sharing formula for mumbai likely to be confirmed | महाविकास आघाडीचा मुंबईतील फॉर्म्युला ठरला? ३-२-१ असे होणार जागावाटप? कोण-कुठे लढणार?

महाविकास आघाडीचा मुंबईतील फॉर्म्युला ठरला? ३-२-१ असे होणार जागावाटप? कोण-कुठे लढणार?

Maha Vikas Aghadi Seat Sharing For Mumbai In Maharashtra Assembly Election 2024: राज्यात जून २०२२ मध्ये भाजप-शिंदेसेना सरकार आले. नंतरच्या वर्षांत अजित पवारांचा गट सत्तेत सहभागी झाला. तीन पक्ष असे एकत्र आल्याने सत्ता तर मिळाली; पण आता पुन्हा सत्ता मिळविताना नेमके तीन पक्षांचे असे एकत्र येणे अडचणीचे ठरू लागले आहे. महायुतीतील नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचे भाजपा, शिंदे गट तसेच अजित पवार गटातील आमदार परत आधीच्या गटात वा पक्षात जाण्यास इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. यातच महाविकास आघाडीचे मुंबईतील जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जय्यत तयारीला सुरुवात केली आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेत यश मिळून सत्तापालट करण्याचे मनसुबे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रचले आहेत. राज्यातील विधानसभा डिसेंबर महिन्यात होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून महाविकास आघाडीतील नेते महायुतीवर टीका करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीत जागावाटपाबाबत जवळपास एकमत झाल्याचे दिसते. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा लढण्याचे सूत्र जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. प्रस्तावित फॉर्म्युलामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला १५, काँग्रेसला १४ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गट आणि इतर मित्र पक्षांना ७ जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

मुंबईत लोकसभा विजयाच्या आधारावर जागावाटपाचा फॉर्म्युला

आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईतील जागावाटप हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर आधारित आहे. महाविकास आघाडीने मुंबईतील लोकसभेच्या सहा पैकी चार जागा जिंकल्या. काँग्रेस पक्षातील काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा जागांशी संबंधित सहा विधानसभा मतदारसंघांपैकी विजयी पक्ष तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. आता उर्वरित तीन जागांबाबत बोलायचे झाले तर त्यांच्या जागावाटपासाठी हा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला आहे. यापैकी दोन जागा महाविकास आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला आणि एक तिसऱ्या मित्र पक्षाला देण्यात येणार आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला तीनही पक्षाच्या नेत्यांनी स्वीकारला?

लोकसभा निवडणुकीत मुंबईत भाजपाने ज्या जागांवर विजय मिळवला आहे, तिथे महाविकास आघाडी समान सूत्र स्वीकारणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या पक्षाला जागांचा मोठा वाटा मिळेल, असे म्हटले जात आहे. महाविकास आघाडीतील एका नेत्याने सांगितले की, लोकसभेच्या जागा आम्ही जिंकल्या आहेत. त्यांच्यासाठी आम्ही ३-२-१ फॉर्म्युला स्वीकारणार आहोत. विजयी पक्षाला ३ किंवा ४ जागा मिळतील आणि उर्वरित जागा संख्याबळाच्या आधारे दिल्या जातील. या सूत्राला तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मान्यता दिली आहे, असा दावा या नेत्याने केला आहे. 

शिवसेना ठाकरे गट मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवणार!

महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट मुंबईत जास्तीत जास्त जागा लढवणार असल्याचे या नेत्याने सांगितले. त्यात आमदारांची संख्या सर्वाधिक असून, ठाकरे गटाचे संघटन मुंबईत अधिक मजबूत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधारे, महाविकास आघाडी मुंबई शहर आणि उपनगरातील ३६ विधानसभा जागांपैकी २० जागांवर पुढे आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपासोबत युतीत लढली होती. त्यात १९ जागांवर निवडणूक लढवली होती आणि १४ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने २९ जागांवर निवडणूक लढवली आणि ४ जिंकल्या. तर राष्ट्रवादीने ६ जागांवर निवडणूक लढवली होती आणि फक्त एका जागेवर विजय मिळाला. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादी पक्षाने बाजी मारली. समाजवादी पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, जागावाटपाची चर्चा योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. जागावाटपाबाबत चिंता करू नये. विजयाची शक्यता सर्वांना सारखीच आहे, असा संदेश महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे नेते कार्यकर्त्यांना देत आहेत. कोणत्याही पक्षाला तिकीट मिळाले तरी महाविकास आघाडीची सत्ता यावी, यासाठी उर्वरित दोघांना काम करावे लागणार असल्याचा पुनरुच्चार सर्व नेते करत आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. याबाबत जनसत्ताने वृत्त दिले आहे.

लोकसभेतील धक्क्यानंतर, ३ पक्ष आणि महायुती सरकारने उचललेल्या पावलांमुळे वातावरण फिरतंय किंवा फिरेल, असं वाटतं का?

हो, महायुतीला फायदा होऊ शकतो (345 votes)
नाही, वातावरण फिरताना दिसत नाही (505 votes)

Total Votes: 850

VOTEBack to voteView Results


 

Web Title: maharashtra assembly election 2024 congress sharad pawar ncp uddhav thackeray shiv sena maha vikas aghadi seat sharing formula for mumbai likely to be confirmed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.