काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 22:55 IST2024-10-26T22:55:11+5:302024-10-26T22:55:22+5:30
आतापर्यंत काँग्रेसनं ८७ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
मुंबई - महाविकास आघाडीत काँग्रेसकडून १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मुंबई, नांदेड, कोल्हापूरातील उमेदवारांची नावे समाविष्ट आहेत. मुंबईतील अंधेरी पश्चिम, वांद्रे पश्चिम जागांवर काँग्रेसनं उमेदवार उतरवले आहेत.
'या' १६ जागांवर काँग्रेस उमेदवार
खामगाव - राणा सानंदा
मालेघाट - हेमंत चिमोटे
गडचिरोली - मनोहर पोरेटी
दिग्रस - माणिकराव ठाकरे
नांदेड दक्षिण - मोहनराव अंबाडे
देगळूर - निवृत्तीराव कांबळे
मुखेड - हेमंतराव पाटील
मालेगाव मध्य - इजाज बेग
चांदवड - शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरी - लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम - दयानंद चोरघे
अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
वांद्रे पश्चिम - आसिफ झकारिया
तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
सांगली - पृथ्वीराज पाटील
काँग्रेसनं आतापर्यंत ३ यादी जाहीर केली असून त्यात ८७ उमेदवारांचा समावेश आहे.
कांग्रेस अध्यक्ष श्री @kharge की अध्यक्षता में आयोजित 'केंद्रीय चुनाव समिति' की बैठक में महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस उम्मीदवारों की तीसरी लिस्ट। pic.twitter.com/0nrRV7gcPz
— Congress (@INCIndia) October 26, 2024