शहरं
Join us  
Trending Stories
1
रिकाम्या खुर्च्या अन् वाट बघत बसलेल्या ममता...; डॉक्टरांच्या बहिष्कारावर म्हणाल्या, मी राजीनामा द्यायला तयार!
2
राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल
3
“सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावले असेल तर चूकच”; वकिलांनी थेट कायदाच सांगितला
4
पॅरालिम्पिक चॅम्पियनसाठी कायपण! चक्क जमिनीवर मांडी घालून बसले PM मोदीजी
5
LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम
6
“गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात
7
अमोल कोल्हेंचा फोटो बॅनरवर कसा?; अजित पवारांनी सांगितले कारण, काय काय बोलले?
8
स्टार क्रिकेटरची फिल्मी लव्ह स्टोरी... पहिल्या भेटीत प्रेमात पडला पण लग्न करायला घेतली ५ वर्ष
9
“आधीचे PM इफ्तार पार्टी ठेवायचे, CJI जायचे; गणपतीला गेल्यावर इतका गहजब का?”: फडणवीस
10
भ्रष्टाचार की महागाई म्हणावे...! ७ वर्षांपूर्वी ४२ कोटींना उड्डाणपूल बांधला, आता तोडायला ५२ कोटी खर्च
11
शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं
12
Shams Mulani ला शतकी डाव साधण्याची संधी! अय्यरचा संघ त्याला रोखणार?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज
14
“२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी
15
'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या...
16
खळबळजनक! महिलेचा हायवेवर सापडला निर्वस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह
17
टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा WTC फायनल खेळणार? ICC ने दिली महत्त्वाची अपडेट
18
"आत्राम साहेब मुलीला नदीत फेकावे वाटले, मग अजितदादांना कुठे ..."; शरद पवार गटातील नेत्याचा हल्लाबोल
19
माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
20
स्मॉलकॅप शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा; LIC चाही मोठा डाव!

"दिल्ली आणि गुजरात लॉबीसमोर झुकलेले, भाजपा सरकार उखडून फेका’’, नाना पटोले यांचं आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 5:01 PM

Maharashtra Assembly Election 2024: महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. (Nana Patole Criticize BJP) महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

नंदूरबार/ मुंबई - महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कर्नाटकतील भाजपा सरकार ४० टक्के कमीशनवाले होते महायुती सरकार तर त्यापुढे गेले आहे, भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रमच या सरकारने रचले आहेत. महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य अशी ओळख निर्माण झाली आहे. महायुती सरकार गुजरातधार्जिणे असून गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे व राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीसमोर व गुजरात लॉबीसमोर झुकणारे भाजपा युती सरकार उखडून फेका, असे आवाहन काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र विभागातील नंदरूबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील आढावा बैठक नंदूरबारमध्ये पार पडली या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्यध्यक्ष आमदार कुणाल पाटील, माजी मंत्री के. सी. पाडवी, खासदार गोवाल पाडवी, खासदार शोभा बच्छाव,प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, आ. शिरीष नाईक, आमदार शिरीष चौधरी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बदलापूरमध्ये ३ वर्षांच्या दोन मुलींवर एका नराधमाने अत्याचार केल्यामुळे जनतेत तीव्र संताप आहे. सरकार कारवाई करत नसल्याने हजारो लोक रस्त्यावर उतरले पण महायुती सरकारला यात राजकारण दिसत आहे. ज्या शाळेत ही घटना घडली ती शाळा भाजपाशी संबंधित आहे, त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न झाला. शाळेने सीसीटीव्ही फुटेज गायब केले, १२ तारखेला ही घटना घडली आणि १५ तारखेला मुख्यमंत्री बदलापुरात होते त्यांनी त्या घटनेकडे लक्ष दिले नाही. पीडित मुलीच्या गर्भवती आईला १२ तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले. सामाजिक संस्थांच्या आणि नागरिकांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करावा लागला. बदलापूर, अकोला, लातूर, नागपूरमध्येही असेच प्रकार घडले त्यामुळे संतप्त महिलांनी १५०० रुपये नको, मुलींना संरक्षण द्या, अशी मागणी केली, यात राजकारण कसे दिसते, असा सवाल पटोले यांनी केला.

बदलापूरच्या वरिष्ठ पीआय महिला असतानाही त्यांनी पीडित मुलीच्या आईला १२ तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवले, त्यांच्यावर सरकारचा दबाव होता हे स्पष्ट आहे. सरकार आपले पाप लवण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी नेमली त्यांची कामगिरी संशयास्पद आहे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे तर भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे या दोघांना बदलावे अशी आमची मागणी आहे असे पटोले म्हणाले.

केंद्रीय बोर्ड किंवा युपीएससीच्या परीक्षा असताना राज्य आयोग परीक्षा ठेवत नाही पण यावेळी त्या एकत्र ठेवल्या असल्याने एमपीएससीच्या परिक्षांची तारीख बदलावी तसेच कृषी संवर्गाच्या २५८ जागांचे नोटीफिकेशन काढावे यासाठी पुण्यात विद्यार्थी दोन दिवसांपासून आंदोलन करत आहेत पण एमपीएससी विद्यार्थ्यांचे ऐकत नाही. आयोगातील अधिकारी मग्रुर आहेत, विद्यार्थ्यांच्या भवितव्यशी ते खेळत आहेत. ग्रामीण भागातील लाखो गरिब विद्यार्थी अधिकारी होऊ पहात आहेत पण त्यांच्या स्वप्नावर एमपीएससी पाणी फेरत आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करण्याची विनंती केली, असे नाना पटोले म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुतीBJPभाजपा