अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:37 AM2024-10-28T06:37:02+5:302024-10-28T06:38:12+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : अजित पवार गटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत स्थान न देण्यात आलेल्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना निफाड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाकडून चार उमेदवारांची तिसरी यादी रविवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केली. यामध्ये प्रतीक्षा लागून राहिलेल्या गेवराई मतदारसंघातून बीडचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना, तर पारनेरमधून जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार गटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या यादीत स्थान न देण्यात आलेल्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना निफाड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
लंकेंविरोधात काेण?
पारनेरच्या जागेवर शरद पवार गटाकडून खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे लंके यांच्याविरुद्ध अजित पवारांकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर लंके यांच्याविरोधात काशीनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.