शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 8:08 PM

माझे टार्गेट महायुतीचं सरकार आणणं, सत्ता आणणे. जी कामे आता सुरू केलीत, ज्या योजना आणल्यात त्या थांबू नये यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणणं हे माझे ध्येय आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई - राज्यातील राजकारणात २०१९ नंतर बरीच उलथापालथ झाली. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले. २०२२ मध्ये शिवसेनेतील एक गट भाजपासोबत आला. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र पक्षाने धक्कातंत्र वापरत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांना शपथ घेण्याची सूचना केली. यात पक्षाने तुमच्यावर अन्याय केला का, असा प्रश्न मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. तेव्हा पक्षाने माझ्यावर अन्याय केला असं कधी वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यामागचं कारणही सांगितलं.

मुलाखतीत ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कोण होता, एक साधा कार्यकर्ता होता. ज्याला पक्षाने नगरसेवक केलं, महापौर केलं, आमदार केलं, मुख्यमंत्री केलं, त्यानंतर विरोधी पक्षनेता केलं, उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसला पक्षाने खूप काही दिले आहे. त्या-त्या वेळेला परिस्थिती पाहून पक्षासाठी दोन पावलं मागे जाणं किंवा पक्षाने सांगितलेली भूमिका स्वीकारणं यात कुठलाही अन्याय नाही. आज मी मोठा होऊ शकलो, चार लोक मला ओळखतात हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे. हा पक्ष माझ्या पाठीशी नसता तर नागपूरातील एखादा वकील म्हणून मला फार तर मला ओळख मिळाली असती, असं त्यांनी सांगितले.  लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि वरिष्ठ सहायक संपादक यदू जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. 

मुख्यमंत्री झालो असतो तर...

मी सुरुवातीला पक्षाला सांगितले होते, आपण जे काही परिवर्तन करतोय त्यात मला सत्तेबाहेर राहू द्या. त्यामागे माझी भूमिका अशी होती की, लोकांना काय सांगायचे? कालपर्यंत मुख्यमंत्री राहिला आणि सत्तेसाठी हा उपमुख्यमंत्रिपद घेतोय. या माणसाला सत्तेपलीकडे काहीच नाही, याचं माझ्यावर मानसिक दडपण होते. पक्षाने मला परवानगीही दिली होती. पण नंतर पक्षाला वाटले सरकार चालवायचे असेल आपल्याकडून प्रमुख व्यक्ती आत हवा, नंतर पक्षाने मला सांगितले. मला खूप दडपण होते, आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही. मात्र त्यानंतर देशभरातील कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतले, मुख्यमंत्री झालो असतो तरी एवढी आपुलकी आणि जिव्हाळा मिळाला नसता. देशातील सगळ्या भाजपा नेत्यांचे, मुख्यमंत्र्यांचे फोन आले. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे असं म्हटलं. अशा प्रकारची संवेदना व्यक्त करणे हे देखील मोठे आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषित होतील हे कार्यकर्त्यांना कल्पना नसल्याने त्यांना धक्का बसला. परंतु काही काळाने ते स्वीकारले गेले, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला. 

दरम्यान, कार्यकर्त्यांची अपेक्षा असणे गैर नाही. २०१४-१९ काम करण्याची मला संधी मिळाली. महाराष्ट्राला नवीन चेहरा दिला. नवीन कार्यसंस्कृती रुजवली. जलसंवर्धन, विकास, औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली. २०१९ साली आमच्याविरोधात राजकीय खेळी झाली. त्यानंतर पुन्हा राजकीय पटलावर आणण्यासाठी दोन पावलं मागे जाणं गरजेचं होते. महायुतीसाठी मुख्यमंत्रिपद टप्प्यात दिसते. माझे टार्गेट महायुतीचं सरकार आणणं, सत्ता आणणे. जी कामे आता सुरू केलीत, ज्या योजना आणल्यात त्या थांबू नये यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणणं हे माझे ध्येय आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ

माझ्याविरोधात षड्यंत्र

महाराष्ट्रात केंद्रस्थानी मीच आहे याचा आनंद व्यक्त करायचा की दु:ख कळत नाही. दिवसातून तीनदा माझे नाव घेतल्याशिवाय महाविकास आघाडीचा दिवस पूर्ण होत नाही. कुणी किती व्हिलन करण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणात जनता एखाद्याला व्हिलनही करते आणि हिरोही करते. इतके सगळे लोक सातत्याने माझ्यामागे राजकीय चिखलफेक करतात. वैयक्तिक चिखलफेक करतात. कुटुंबावर चिखलफेक करतात. सगळ्या प्रकारचे हातखंडे वापरण्याचा प्रयत्न होतो. माझ्याविरोधात षड्यंत्र रचली जातायेत ते पुढे पाहायला मिळेल. जनतेचा विश्वास माझ्यामागे आजही दिसून येतो. त्यामुळे जे बोलतायेत त्यांची विश्वासार्हता नाही हे दिसून येते, असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंच्या विधानाशी सहमत

मराठा आणि ओबीसी असा संघर्ष होण्यामागे संकुचित राजकारण कारणीभूत आहे. महाराष्ट्रात असं राजकारण सुरू करणारे नेते कोण हे सर्वांना ठाऊक आहे. मराठा आरक्षणाची मागणी १९८० पासून सुरू होती. १९८२ साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षण दिले नाही तर माझं जीवन संपवेन असं सांगितले. ते दिले नाही आणि त्यांनी स्वत:ला गोळी मारून घेतली. तेव्हापासून २०१४ पर्यंत साडे चार वर्षाचा अपवाद वगळता काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष यांचे सरकार राहिले. ४ वेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले. कधीही मराठा आरक्षण दिले नाही. मराठा मागास असलेला रिपोर्टही त्यांनी घेतला नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही आयोगाची शिफारस घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले. हायकोर्टात टिकवले. सुप्रीम कोर्टातही मी मुख्यमंत्री असेपर्यंत टिकवून ठेवले. माझं मुख्यमंत्रिपद गेले. त्यानंतर मविआ सरकारमध्ये काय झाले हे पाहिले. माझ्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून १ लाख मराठा उद्योजक घडवले. सारथीमुळे अनेक मराठा तरूण आयएएस, आयपीएस झाले. वंचित मराठा समाजासाठी आम्ही काम केले पण दुसरीकडे मराठा समाजाचा मतासाठी वापर करणारे ते लोक आहेत. मी राज ठाकरेंच्या प्रत्येक विधानाशी सहमत नाही. परंतु, जातीयवादाच्या विधानाशी पूर्ण सहमत आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा