Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 08:12 PM2024-11-20T20:12:50+5:302024-11-20T20:13:50+5:30

Exit polls Of Maharashtra Election: मतदान संपत नाही तोच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज धडाधड येऊ लागले होते.

Maharashtra Assembly Election 2024: In Maharashtra, 6 out of 10 exit polls favor the Mahayuti BJP; One did not give majority to anyone, three to MVA | Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही

Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही

महाराष्ट्राची निवडणूक पार पडली आहे. आज मतदान झाले आहे. येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मतदान संपत नाही तोच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज धडाधड येऊ लागले होते. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तीन एक्झिट पोलनी मविआला सत्तेत बसताना दाखविले आहे. एकच एक्झिट पोल असा आहे ज्याने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही. 

एक असा एक्झिट पोल आहे जो २०१९ मध्ये खरा ठरला होता, तो अद्याप आलेला नाही. २०१९ मध्ये ७ एक्झिट पोल आले होते. परंतू अॅक्सिस माय इंडिया हा एकमेव खऱ्या निकालाशी मिळता जुळता ठरला होता. 

असे आहेत एक्झिट पोल...


इलेक्टोरल एज एक्झिट पोल
महायुती ११८
मविआ १५०

पोल डायरी एक्झिट पोल...
महायुती १२२-१८६
मविआ ६९- १२१

चाणक्यचा एक्झिट पोल
महायुती १५२-१६०
मविआ १३०-१३८

मॅट्रिझ एक्झिट पोल...
महायुती - १५०-१७०
मविआ - ११०-१३०

पी मार्क्यू एक्झिट पोल
महायुती - १३७-१५७
मविआ -१२६-१४६

रिपब्लिक एक्झिट पोल
महायुती - १३७-१५७
मविआ -१२६-१४६

SAS एक्झिट पोल
महायुती - 127-135
मविआ -147-155 

पीपल्स पल्स एक्झिट पोल
महायुती 175-195    
मविआ 85-112    
इतर 07-12

भास्कर रिपोर्टर्स पोल
महायुती १२५-१४०
मविआ १३५- १५०
इतर २०-२५

लोकशाही महारुद्र
महायुती १२८-१४२
मविआ १२५-१४०
इतर १८-२३
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024: In Maharashtra, 6 out of 10 exit polls favor the Mahayuti BJP; One did not give majority to anyone, three to MVA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.