शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

मुंबईत काँग्रेसचे ११ पैकी फक्त २ उमेदवार मराठी; भाजपाचा घणाघात, ठाकरे गटावरही निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 14:00 IST

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसनं ११ पैकी केवळ २ मराठी माणसांना उमेदवारी दिली आहे. इतका मराठीद्वेष काँग्रेसनं केला आहे. उद्धव ठाकरेंची यावर भूमिका काय..? मराठी चेहरे काँग्रेसमधून हद्दपार केले असा आरोप करत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी काँग्रेससह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आशिष शेलार म्हणाले की, काँग्रेसचे जे मराठी चेहरे आहेत त्यांना उमेदवारीतून डावलण्यात आले. बाजूला सारले गेले. मग त्यात भाई जगताप, मधुकर अण्णा चव्हाण, सचिन सावंत जे मोजके राहिलेत त्या सगळ्यांना मराठी आहेत म्हणून कात्रजचा घाट दाखवला आहे. एवढा काँग्रेसचा मराठी द्वेष उद्धव ठाकरेंना मान्य आहे का..? काँग्रेसची महाराष्ट्रविरोधी भूमिका ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही काँग्रेसचे सर्वोच्च नेते छाती पिटवून महाराष्ट्र मराठी भाषिक राज्य आम्ही होऊ देणार नाही असं म्हणत होते.  समस्त महाराष्ट्र पेटून उठला एकत्रित आला, आंदोलन केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली तेव्हा आंदोलनकर्त्यांना घरात घुसून गोळ्या मारल्या आहेत. आमचे १०६ हुतात्मे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत गेले. मराठी माणसाच्या छाताडावर गोळ्या याच काँग्रेसने घातल्या. मराठी भाषिक राज्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसनं तेव्हाही मराठी विरोधाची भूमिका घेतली होती आणि आता तीच भूमिका पुढे नेत ११ पैकी केवळ २ मराठी उमेदवार दिलेत. हा मराठीद्वेष त्यावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी असं त्यांनी म्हटलं. 

तसेच स्थैर्य, शांतता प्रगती हवी असेल तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून हद्दपार करा. याकुब मेमनचं समर्थन हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील लोक करतात. जिथे जिथे त्यांचे राज्य येते तिथे अशा घटकांचे समर्थन महाविकास आघाडी करते. केवळ याकुब मेमनंच नाही, इब्राहिम मुसा जो मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी तो लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा प्रचार करत होता. हे सहज होत नाही. अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांशी यांचे लागेबांधे आहेत. कसाबच्या भूमिकेचं समर्थन, जे वीर पोलिसांनी बलिदान दिले त्यांना लागलेल्या गोळ्या या कसाबच्या नव्हत्या असं काँग्रेस-राष्ट्रवादी-उबाठा म्हणतात. जम्मू काश्मीर ते महाराष्ट्र अशांतता निर्माण करणाऱ्या लोकांसोबत मविआ नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे या प्रवृत्तीला हद्दपार करा असं आवाहन आशिष शेलार यांनी केले आहे. 

दरम्यान, मुस्लीमांना आरक्षण देण्याची मागणी समाजवादी पक्ष करतोय, धर्माच्या आधारे आरक्षण संविधानात मान्य नाही. परंतु ही मागणी सपा करते, शरद पवार त्यांना पाठिंबा देतात, उबाठा त्यांना मांडीवर घेते. त्यामुळे तुष्टीकरणाच्या राजकारणाचे उद्धव ठाकरे महामेरू आहेत. मुस्लीम आरक्षणावर उद्धव ठाकरेंची भूमिका काय हे त्यांनी स्पष्ट करायला हवं अशी मागणीही आशिष शेलारांनी केली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसAshish Shelarआशीष शेलार