तावडे पैसे वाटतानाचा व्हिडीओ असेल तर तो कोणी बघायला हवा, काल अनिल देशमुखांचे डोके आपोआप फुटले. तो हल्ला कोणी केला, परग्रहावरून दगड आला का, असा सवाल ठाकरे यांनी केला. तसेच जर विनोद तावडेंकडे पैसे सापडले असतील तर हे कदाचित गँगवॉ़रही असू शकते, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मला माहिती मिळाली की कदाचित गँगवॉर असू शकेल. निवडणूक आयोगाने हे घडले असेल तर कारवाई केलीच पाहिजे. कायदा सर्वांना सारखा आहे. तावडे जर का तावडीत सापडले असतील तर आजवर सरकारे पाडली कशी त्याचा हा पुरावा आहे. ज्यांनी उघडकीस आणले त्यांचे कौतुक केले पाहिजे. कदाचित हे त्यांच्यातील गँगवॉर असू शकते. भाजपमध्ये असेल किंवा शिंदेमधील असेल. कारण नाशिकमध्ये काल असेच व्हिडीओ समोर आले आहेत, असे ठाकरे म्हणाले.
बहिणींना १५०० आणि मित्रांना थप्प्याच्या थप्प्या चालल्या आहेत. हे महाराष्ट्र बघतोय. हा अजित पवार, शिंदे आणि भाजपाचा नोट जिहाद आहे का? विनोद तावडेंना पीएचडी मिळायला हवी. काही दिवसांपासून त्यांची स्तुती होत होती. त्यांनी काही राज्यांत सरकारे पाडली, काही राज्यांत बनविली, ते गुपित होते. आता निवडणूक आयोग काय कारवाई करतो ते पहायचे, असे ठाकरे म्हणाले.
तसेच मी आता तुळजा भवानीला जात असताना माझ्या बॅगा तपासल्या गेल्या. माझी बॅग तर रिकामीच सापडली तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले. सामान्यांच्या बॅगा चार-चारदा तपासल्या जातात. तर तावडे कसे नेतात असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.