शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 13:06 IST

Maharashtra Assembly Election 2024 : विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे यांनाही आपले हसू आवरता आले नाही.

Maharashtra Assembly Election 2024 :  परळी : धनंजय मुंडे यांनी कमळच हाती घेतलं असतं तर बरं झालं असतं, असं विधान भाजप नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्या प्रचारसभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. विशेष म्हणजे, पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे व्यासपीठावर उपस्थित धनंजय मुंडे यांनाही आपले हसू आवरता आले नाही.

बीड जिल्ह्यातील परळीतून धनंजय मुंडे हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी आम्ही एकमेकांना एकमेकांच्या विरोधात खूप शक्ती वाया घालवली. धनंजय मुंडे यांनी कमळाच्या चिन्हावर लढायला पाहिजे होतं, असं विधान करत पंकजा मुंडे यांनी करत आपल्या मनातील खंत बोलून दाखवली.

परळी विधानसभेत आपले कमळ चिन्ह नाही, तुम्ही ते शोधणार आहात हे मला माहिती आहे. म्हणूनच धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं. आता आपल्याला धनंजय मुंडेंना आमदार करायचं आहे. या देशात अनेक परिवार एकमेव एकमेका विरुद्ध लढत आहेत. राजकारणाची पातळी अनेक जणांनी सोडली आहे. या निवडणुकीत आपण एक आहोत सर्वांना दाखवून द्यायचं आहे. सन्मानाची लढाई असते, पैशाची सत्तेची नसते, असंही यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या.

याचबरोबर, परळीमधून २००९ ला आमदार होईल, असं माझ्या मनात कधीही नव्हतं. मी कधीच मुंडे साहेबांचा शब्द खाली टाकला नाही. आमचं घर फुटलं आणि महाराष्ट्र बघत होता. बाबा एकटे पडले म्हणून मी राजकारणात आले. मी जीवनात काय चांगलं काम करू शकले, मला माहिती नाही. मात्र वाईट काम मी कधीच केलं नाही. मी ज्यावेळेस लोकसभेला उभी राहिली, त्यावेळी माझा भाऊ माझ्यासोबत आला आणि माझा प्रचार केला, मला खूप चांगलं वाटलं, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

कुठलीही छोटी निवडणूक सोपी समजणं हे आपल्या रक्तात नाही. आपण प्रत्येक निवडणूक जीव लावून लढतो. त्यामुळं आपल्याला बदला घ्यायचा नाही, तर राजकारणाचा वातावरण बदलायचं आहे. मुंडे साहेब असते तर हे राजकारण बघून भावनिक झाले असते. त्यामुळं आपल्याला हा विजय मिळवायचाच आहे आणि गुलाल उधळायचा आहे. ईश्वरासमोर आणि मुंडे साहेबांव्यतिरिक्त कुणासमोरही झुकायचे नाही, असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस