“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 03:21 PM2024-10-18T15:21:34+5:302024-10-18T15:22:09+5:30

Maharashtra Assembly Election 2024: तुमच्या काकांनी कसे राजकारण केले पाहा. पैशांच्या जीवावर राजकारण करता येत नाही, असा सल्ला अजित पवारांना देत ज्येष्ठ नेत्याने भाजपाला रामराम करत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

maharashtra assembly election 2024 laxman dhoble said because of annoying of ajit pawar will left bjp and join ncp sharad pawar group | “अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?

“अजितदादांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो, शरद पवार गटात जाणार”; कुणी केली घोषणा?

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यातच पक्ष बदलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महायुतीतील अनेक नेते, पदाधिकारी सोडचिठ्ठी देत महाविकास आघाडीत जाताना दिसत आहेत. यात सर्वाधिक संख्या शरद पवार गटात प्रवेश करणाऱ्यांची दिसत आहे. उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर यात भर पडू शकते, असा कयास बांधला जात आहे. यातच आता अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून भाजपाला रामराम करत आहे. शरद पवार यांना साथ देणे आत्ता गरजेचे आहे. त्यामुळे तुतारी हातात घेण्याचा निर्णय केल्याची घोषणा भाजपाच्या ज्येष्ठ प्रवक्त्यांनी केली आहे. 

कॉलेजमध्ये असल्यापासून शरद पवार यांच्यासोबत काम करत आलो आहे. निवडणुका जिंकत आलो आहे. आता मुलाला शरद पवार यांची भेट घडवून द्यावी, यासाठी मुंबईत आलो. भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अद्याप तरी राजीनामा दिलेला नाही. परंतु, कार्यकर्त्यांनी तुतारी हाती घेण्यास समर्थन दिले आहे. अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून भाजपामध्ये प्रवेश केला होता. पण, अजित पवार महायुतीत आले. अजित पवार यांचा पुन्हा त्रास होत असल्याने भाजपाला रामराम करत शरद पवार गटात जाणार आहे. पुन्हा एकदा शरद पवारांना साथ देणार आहे, अशी घोषणा भाजपाचे ज्येष्ठ प्रवक्ते आणि माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते. 

अजित पवार यांच्या त्रासाला कंटाळून भाजपा सोडतो

दोन दिवसांत आपला राजीनामा भाजपला पाठवून देत आहे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे, असे लक्ष्मण ढोबळे यांनी म्हटले आहे. लक्ष्मण ढोबळे यांचे चिरंजीव अभिजित ढोबळे मोहोळ विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून लक्ष्मण ढोबळे शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित होते. राष्ट्रवादीत असताना ते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा लक्ष्मण ढोबळे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करत आहेत. 

दरम्यान, अजित पवारांना वाटते की, पैशांचा जीवावर राजकारण करता येते, मात्र तसे होत नाही. तुमच्या काकांनी कसे राजकारण केले ते पाहा. मोहोळ मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, मात्र आता राष्ट्रवादी प्रवेश निश्चित आहे, अशी ठाम प्रतिक्रिया लक्ष्मण ढोबळे यांनी दिली आहे. 
 

Web Title: maharashtra assembly election 2024 laxman dhoble said because of annoying of ajit pawar will left bjp and join ncp sharad pawar group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.