Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु आहे.या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी (दि.१०) आपले संकल्प पत्र म्हणजेच निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थित भाजपने हे संकल्प पत्र जारी केले आहे. या संकल्प पत्रात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, आशिष शेलार उपस्थित होते.
आज १० नोव्हेंबरच्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला पराभूत केले होते, त्याच शिवशक्तिच्या प्रेरणेने काम करणारे नेते हा अर्थसंकल्प सादर करत आहेत, असे सांगत भाजपकडून या पत्रकार परिषदेची सुरूवात करण्यात आली. यावेळी संकल्प पत्र हे आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. तसेच, भाजप सरकारने मागच्या दहा वर्षात मोठी कामे केली आहेत, असे सांगत अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंसह शरद पवार आणि काँग्रेसवरही निशाणा साधला.
आघाडी सरकारच्या काळात जनतेला खूप त्रास सहन करावा लागला, असे अमित शाह म्हणाले. तसेच, जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द होईल, यावर कोणाचाही विश्वास नव्हता. पण आज एनडीए सरकारने कलम ३७० रद्द करण्याचे काम केले आहे. आम्ही समृद्ध भारताचे वचन दिले होते. १० वर्षात आम्ही देशाची अर्थव्यवस्था पाचव्या स्थानावर नेली. आमचे वचन आहे की, २०२७ मध्ये आम्ही भारताला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवू, असे अमित शाह यांनी सांगितले.
महायुतीची महत्त्वाकांशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता लाडक्या बहिणींना १५०० नाही तर २१०० रुपये देणार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच, हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे, २०१४ मध्ये जे संकल्पपत्र जाहीर केलं होतं, २०१९ च्या निवडणुकांना सामोरे जाताना त्या संकल्पपत्रातील कोणत्या गोष्टी पूर्ण केला, याचा रिपोर्ट दिला होता. त्यामुळे भाजपकरिता किंवा महबायुतीसाठी संकल्पपत्र म्हणजे फक्त कागदी डॉक्युमेंट नाही, तर त्या दिशेने काम करण्यासाठी एक अतिशय पवित्र अशा प्रकारचं डॉक्युमेंट आहे. राज्यातील जनतेचा विश्वास महायुतीवर आहे, असे देंवेद्र फडणवीस म्हणाले.
भाजपच्या संकल्पपत्रात काय-काय आहे?- लाडक्या बहिणींना पुढील काळात १५०० ऐवजी २१०० रुपये देणार- शेतकऱ्यांसाठी भावान्तर योजना (हमीभावाने खरेदी होणार नाही, त्याठिकाणी फरकाची रक्कम खात्यात टाकणार)- शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार- प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवाऱ्याचा हक्क- वृद्धांची पेन्शन २१०० (सहायतेच्या योजनांमध्ये वाढ करणार)- जीवनावश्यक वस्तुंचे भाव स्थिर ठेवणार- २५ लाख रोजगारांची निर्मिती - १० लाख विद्यार्थ्यांना वेतन- गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी सौरचा वापर करुन ३० टक्के कमी करणार-विज्ञान तंत्रज्ञान : मेक इन महाराष्ट्राला प्रभावीपणे राबवणार- महाराष्ट्राला फिनटेक आणि एआयचं हब करू- एअरोनॉटिकल आणि स्पेसमध्ये उत्पादनावर काम करू- अक्षय अन्न योजना- महारथी : एआय लॅब्स- कौशल्य जनगणना करणार - छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र- हमी भावापेक्षा कमी भावात खरेदी करत असेल तर भावात्तम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार- अडीच वर्षांमध्ये १ लाखापेक्षा जास्त सरकारी नोकऱ्या दिल्या.