महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 06:19 AM2024-11-02T06:19:31+5:302024-11-02T06:20:21+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : याआधी २०१४ साली महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराचा प्रारंभ इचलकरंजीतून करण्यात आला होता. त्याच पद्धतीने आता कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत घेतला आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : Mahayuti's campaign will start from Kolhapur, the first meeting will be held on 'Tapovan' on Tuesday  | महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 

महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 

Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर :  विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा महाराष्ट्रातील प्रचाराचा प्रारंभ करवीरनगरीतून होणार आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता तपोवन मैदानावर महायुतीची पहिली जाहीर सभा होणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

याआधी २०१४ साली महायुतीच्या विधानसभेच्या प्रचाराचा प्रारंभ इचलकरंजीतून करण्यात आला होता. त्याच पद्धतीने आता कोल्हापुरातून प्रचाराचा प्रारंभ करण्याचा निर्णय महायुतीच्या नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत घेतला आहे.

कोल्हापूरमध्ये महायुतीतील मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, भाजपचे खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्यचे संस्थापक आमदार विनय कोरे, खासदार धैर्यशील माने, नुकतेच भाजपमध्ये आलेले आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर अशी सत्तारूढ मंडळी आहेत.

यांच्यासह अन्य उमेदवारांवर ही पहिली प्रचार सभा यशस्वी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या सर्व उमेदवारांची तातडीची बैठक शनिवारी सकाळी होणार आहे. त्यात सभेचे संपूर्ण नियोजन केले जाणार आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Mahayuti's campaign will start from Kolhapur, the first meeting will be held on 'Tapovan' on Tuesday 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.