शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण

By यदू जोशी | Published: November 06, 2024 11:22 AM

Maharashtra Assembly Election 2024: मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा या गीतात थोडा बदल करून उद्याच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले तर 'मंगलदेशा, नातेवाइकांच्या देशा' असे चित्र दिसत आहे. मामा, भाचे, काका पुतणे, भाऊ-बहिणी, साडू, मेहुणे असे मोठे गणगोत निवडणुकीच्या रिंगणात आहे.

- यदु जोशी  मुंबई : मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा या गीतात थोडा बदल करून उद्याच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहिले तर 'मंगलदेशा, नातेवाइकांच्या देशा' असे चित्र दिसत आहे. मामा, भाचे, काका पुतणे, भाऊ-बहिणी, साडू, मेहुणे असे मोठे गणगोत निवडणुकीच्या रिंगणात आहे. महाराष्ट्राचे सत्ताकारण साडेतीनशे घराण्यांमध्ये फिरते असे पूर्वी म्हटले जायचे, त्याची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कुठे एकमेकांच्या विरोधात, कुठे मित्रपक्षांकडून वेगवेगळ्या मतदारसंघांत तर कुठे विरोधी पक्षाकडून अनेक सख्खे नातेवाईक भाग्य अजमावत आहेत. अहमदनगर जिल्ह्याने तर विक्रमच केलेला आहे. नंदुरबारमध्ये एकाच गावित कुटुंबात चार उमेदवार आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख यांचे चार नातेवाइक भाग्य अजमावत आहेत. नात्यागोत्यांतील उमेदवारांची विक्रमी संख्या बघायला मिळत आहे. एकमेकांचे नातेवाईक सगळ्याच पक्षांमधून लढत आहेत. बरेच नेते, आमदार, उमेदवार आधीपासूनच प्रस्थापित आहेत.

एकाच परिवारात चार जण; तीन पक्षांकडून, एक अपक्षकाटोलमधून शरद पवार गटाचे उमेदवार सलिल देशमुख हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र. अनिल देशमुख यांचे चुलतभाऊ माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र आशिष हे सावनेरमध्ये भाजपचे उमेदवार. आशिष यांचे सख्खे बंधू डॉ. अमोल हे सावनेरमध्येच काँग्रेसचे बंडखोर (अपक्ष) म्हणून रिंगणात आहेत. अनिल देशमुख यांच्या सख्ख्या बहिणीचा मुलगा अमर काळे हे वर्धेचे खासदार आहेत. अमर यांची पत्नी मयूरा या आर्वीमधून शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत.

अशोक चव्हाणांची कन्या, भाची उतरली मैदानात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया या भोकरमध्ये भाजपच्या उमेदवार आहेत. भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या मीनल पाटील खतगावकर या अशोक चव्हाण यांच्या भाचेसून आहेत आणि त्या नायगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवार आहेत. याच जिल्ह्याच्या लोहा मतदारसंघात अजित पवार गटाचे प्रताप पाटील-चिखलीकर यांच्याविरुद्ध त्यांच्या सख्ख्या भगिनी आशा श्यामसुंदर शिंदे शेकापतर्फे मैदानात आहेत. मुखेडमध्ये भाजपचे उमेदवार आ. तुषार राठोड यांच्याविरुद्ध त्यांचे पुतणे माजी जि.प. सदस्य संतोष राठोड अपक्ष लढत आहेत.

ठाकरे परिवारातील तिघे आजमावताहेत भाग्य उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचे पुत्र आ. आदित्य ठाकरे वरळीतून लढत आहेत. उद्धव यांचे चुलतभाऊ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित हे माहीममधून रिंगणात आहेत. आदित्य यांचे सख्खे मावसभाऊ वरूण सरदेसाई हे वांद्रे पूर्वमध्ये उद्धवसेनेकडून लढत आहेत. 

रावसाहेब दानवेंच्या मुलाला कमळ, मुलीला धनुष्य भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे पुत्र विद्यमान आमदार संतोष दानवे है भोकरदनमध्ये भाजपचे तर रावसाहेबांच्या कन्या संजना जाधव कन्नडमध्ये शिंदेसेनेकडून लढत आहेत. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे पैठणमधून शिंदेसेनेकडून लढत आहेत.

इकडे भाचा, तिकडे मामा माजी मंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आकाश खामगावात भाजपकडून रिंगणात आहेत. आकाश यांचे चुलतमामा आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू एकडे हे मलकापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत.रिसोडमध्ये काँग्रेसचे अमित झनक यांच्या कुटुंबाला राजकारणाची दीर्घ परंपरा आहे. त्यांच्या विरोधातील शिंदेसेनेच्या उमेदवार भावना गवळी या स्वतः तसेच त्यांचे वडील हेही खासदार होते.कारंजामध्ये भाजपचे दिवंगत नेते राजेंद्र पाटणींचे पुत्र ज्ञायक यांनी आता शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे.

एका घरात दोन पक्ष माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर मुक्ताईनगरमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत. रोहिणी यांच्या वहिनी रक्षा खडसे या रावेरच्या खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री आहेत.

चार गावित मैदानात नंदुरबारमध्ये आदिवासी विकासमंत्री भाजपचे डॉ. विजयकुमार गावित लढत आहेत. त्यांच्या कन्या डॉ. हिना या अक्कलकुवा मतदारसंघात अपक्ष लढत आहे.  विजयकुमार गावित यांचे सख्खे भाऊ राजेंद्र गावित हे शहादामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत. दोघांमध्ये आधीपासून मतभेद आहेत. नवापूरमध्ये माजी आमदार शरद गावित अपक्ष लढत असून ते विजयकुमार यांचे सख्खे भाऊ आहेत. 

वडील, मुलगी आणि पुतण्या एकमेकांच्या विरोधात अहेरीत अजित पवार गटाचे उमेदवार व मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात मुलगी भाग्यश्री आत्राम या शरद पवार गटाकडून मैदानात आहे. धर्मरावबाबांचे पुतणे अंबरिश आत्राम अपक्ष लढत आहेत.

 सख्ख्या पुतण्याने दिले आव्हानउपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीत त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र यांनी बारामतीत आव्हान दिले आहे. युगेंद्र यांना शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे.-पुसदच्या नाईक घराण्यातील विद्यमान आमदार इंद्रनील नाईक पुसदच्या रिंगणात आहेत. त्यांचे सख्खे भाऊ ययाती हे कारंजामधून अपक्ष लढत आहेत.- माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचे सख्खे पुतणे व विद्यमान आमदार ऋतुराज पाटील हे दक्षिण कोल्हापुरात काँग्रेसकडून लढत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपचे राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांचे चुलतभाऊ अमल महाडिक भाजपकडून लढत आहेत. राधानगरीत उद्धवसेनेचे उमेदवार के. पी. .पाटील यांच्याविरुद्ध त्यांचे सख्खे मेहुणे मेहूणे ए. वाय. पाटील अपक्ष रिंगणात आहेत. विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर या शरद पवार गटाकडून लढत आहेत. 

सख्खे भाऊ दोन पक्षांकडून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र नितेश कणकवलीत भाजपचे उमेदवार आहेत. दुसरे पुत्र निलेश कुडाळमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार आहेत. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे रत्नागिरीतून शिंदेसेनेतर्फे लढत आहेत तर त्यांचे सख्खे बंधू किरण सामंत हे याच जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघात शिंदेसेनेकडून लढत आहेत.

धानोरकरांचे बंधू काँग्रेसकडून उतरले निवडणूक रिंगणात चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे वरोरामध्ये काँग्रेसकडून लढत आहेत. प्रतिभा आणि त्यांचे दिवंगत पती बाळूभाऊ धानोरकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. काकडेंच्या विरोधातील भाजपचे उमेदवार करण देवतळे हे माजी मंत्री दिवंगत संजय देवतळे यांचे पुत्र आहेत.

अहमदनगरमध्ये सबकुछ नातेवाईक- संगमनेरमधील काँग्रेस उमेदवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भाचेसून मोनिका राजळे या शेवगावमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार आणि उमेदवार आहेत. मोनिका यांच्या नणंदेचे पती शंकरराव गडाख हे नेवाशामध्ये उद्धवसेनेचे आमदार आणि उमेदवार आहेत. बाळासाहेब थोरात यांचे शंकरराव गडाख हे भाचेजावई आहेत. तसेच, शिर्डीतील भाजपचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिस्पर्धी प्रभावती घोगरे (काँग्रेस) या त्यांच्या नातेवाईकच आहेत.- शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे राहुरीत याच पक्षाचे आमदार आणि उमेदवार आहेत. जयंत पाटील यांच्या बहिणीचे दीर चंद्रशेखर घुले पाटील शेवगावमध्ये अपक्ष लढत आहेत. घुले यांचे जावई आशुतोष काळे हे कोपरगावचे अजित पवार गटाचे आमदार आणि उमेदवार आहेत. राहुरीतील भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे जावई संग्राम जगताप हे अहमदनगर मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार आणि उमेदवार आहेत.-माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुत्र  विक्रम हे श्रीगोंद्यात भाजपचे उमेदवार आहेत. अहमदनगरचे खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या पारनेरमध्ये शरद पवार गटाकडून लढत आहेत. अकोलेमध्ये माजी मंत्री मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव अपक्ष लढत आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू विद्यमान आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेडमध्ये शरद पवार गटाकडून लढताहेत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत बबनराव ढाकणेंचे पुत्र प्रताप हे शेवगावमध्ये शरद पवार गटाकडून लढत आहेत. 

पुत्र, नातू, सख्खे साडूही... ■ छगन भुजबळ येवल्यामध्ये अजित पवार गटाकडून लढत आहेत. त्यांचे पुतणे समीर नांदगावात बंडखोरी करून अपक्ष लढत आहेत. माजी मंत्री बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश हे देवळालीमध्ये उद्धवसेनेचे उमेदवार आहेत. माजी मंत्री दिवंगत ए. टी. पवार यांचे पुत्र नितीन पवार हे कळवणमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार आहेत. माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर यांचे पुत्र राहुल हे चांदवडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार आणि उमेदवार आहेत.■ माजी मंत्री पुष्पाताई हिरे यांचे नातू व माजी मंत्री प्रशांत हिरेंचे पुत्र अद्वय हिरे हे मालेगाव बाह्यमधून उद्धवसेनेकडून लडत आहेत. माजी खासदार दिवंगत उत्तमराव ढिकले यांचे पुत्र विद्यमान आमदार राहुल हे नाशिक पूर्वमधून भाजपचे उमेदवार आहेत. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या निर्मला या उद्धवसेनेत बंड करून इगतपुरीत अपक्ष लढत आहेत.■ पाचोरामध्ये शिदेसेनेचे विद्यमान आमदार आणि उमेदवार किशोर पाटील यांच्याविरुद्ध त्यांची चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी (उद्धवसेना), अशी लढत होत आहे.■ सांगली शहरमध्ये माजी मंत्री दिवंगत मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील (काँग्रेस बंडखोर) अपक्ष लढत आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांच्या त्या चुलत वहिनी आहेत. दिवंगत नेते अनिल बाबर यांचे पुत्र सुहास हे शिंदेसेनेचे खानापूरमध्ये उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात माजी आमदार सदाशिव पाटील यांचे पत्र वैभव शरद पवार गटाचे उमेदवार आहेत.■ शिराळामधून विधान परिषदेचे माजी सभापती दिवंगत शिवाजीराव देशमुख यांचे पुत्र सत्यजित हे भाजपचे उमेदवार आहेत. सत्यजित व शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (इस्लामपूरचे उमेदवार) हे सख्खे साहू आहेत. साताऱ्यात भाजपचे आमदार आणि उमेदवार शिवेंद्रराजे भोसले हे माजी मंत्री दिवंगत अभयसिंहराजे भोसले यांचे पुत्र आहेत.■ अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांचे सख्खे आतेभाऊ विद्यमान आमदार रणधीर सावरकर अकोल्यातून लढत आहेत.■ चिंचवडमध्ये भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप याच पक्षाकडून लढत आहेत.■ लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख, तर लातूर ग्रामीणमध्ये त्यांचे बंधू धीरज देशमुख लातूर ग्रामीणचे काँग्रेसचे उमेदवार आहेत.■ माजी आमदार रमेश वांजळे यांचे पुत्र मयूरेश हे मनसेकडून खडकवासलात उमेदवार आहेत. शिवाजीनगर, पुणे येथील भाजप विद्यमान आमदार आणि उमेदवार सिद्धार्थ शिरोळे हे माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पुत्र आहेत.• वर्धेचे काँग्रेस उमेदवार शेखर शेंडे हे नेते दिवंगत प्रमोद शेंडे यांचे पुत्र आहेत. हिंगणारचे विद्यमान आमदार व भाजप उमेदवार समीर मेघे हे माजी मंत्री दत्ता मेघे यांचे पुत्र आहेत. आर्णीचे काँग्रेस उमेदवार जितेंद्र मोघे हे माजी मंत्री शिवाजीराव मोघेचे पुत्र आहेत.■ रामटेकमध्ये काँग्रेस बंडखोर राजेंद्र मुळक हे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब मुळक यांचे पुत्र आहेत. देवळीमधील काँग्रेसचे आमदार आणि उमेदवार रणजित कांबळे हे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभा राव यांचे भाचे आहेत.■ माजी मंत्री गणेश नाईक हे (भाजप) ऐरोलीतून लढत आहेत, तर त्यांचे पुत्र संदीप नाईक हे शरद पवार गटाकडून भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्याविरुद्ध बेलापूरमध्ये लढत आहेत. कल्याण पूर्वमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड भाजपच्या उमेदवार आहेत. बविआचे नेते आ. हितेंद ठाकूर वसईतून, तर त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर याच पक्षातर्फे नालासोपारातून लढत आहेत.■ बीडमध्ये विद्यमान आमदार आणि शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध त्यांचे चुलत भाऊ अजित पवार गटाचे डॉ. योगेश क्षीरसागर लढत आहेत. गेवराईमध्ये अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित विरुद्ध त्यांचे काका बदामराव पंडित उद्धवसेनेकडून लढत आहेत. तुळजापूरचे भाजप उमेदवार राणा जगजितसिंह पाटील हे माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत.■ मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिममधून, तर त्यांचे बंधू विनोद मालाड पश्चिममधून भाजपचे उमेदवार आहेत.■ मानखुर्द शिवाजीनगरमध्ये माजी मंत्री नवाब मलिक अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर त्यांच्या कन्या सना या अणुशक्ती नगरमध्ये याच पक्षातर्फे लढत आहेत. उद्धवसेनेचे विक्रोळीचे उमेदवार सुनील राऊत हे खा. संजय राऊत यांचे बंधू आहेत.■ कुलाबामधील भाजपचे उमेदवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीFamilyपरिवार