शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 6:16 PM

रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या असं जरांगे यांनी सांगितले. 

जालना - दलित, मुस्लीम अन् मराठा एकत्र आलाय हे फायनल...ही आनंदाची वार्ता मराठ्यांमध्ये गेली. मुस्लीम आणि दलित एकत्र आहेत, मराठ्यांचे मतदान विभागले जात होते. आता मराठा, मुस्लीम आणि दलित एकत्र झाल्याने कुणी आपल्या जागा पाडू शकणार नाही. नेत्याला आणि पक्षाला मतदान करायचं नाही. आमचा शिक्का चालणारच...तुम्हाला शेतकरी, गोरगरिब ओबीसी, मराठा मोठा करायचाय तर एकही मत वाया जाता कामा नये. मतदानाच्या आदल्या दिवशी आणि मतदानाच्या दुसऱ्या दिवशी ३ दिवस सुट्टी काढायची, गावात मतदानाला यायचे, शांततेत मतदान करायचे आणि माघारी यायचे. ७५ वर्षातून ही संधी मिळाली ती वाया जाऊन द्यायची नाही असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लीम, दलित आणि मराठा समाजाला केले आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, एका जातीवर राज्यात कुणीही निवडणूक जिंकू शकत नाही, मग मराठा असो वा कुणीही..राजकारण ही सोपी गोष्ट नाही. समाजकारणात ठीक आहे. एखादा समुदाय जमवंणं, मागणी करणं हे वेगळे. आता राजकीय प्रवास करायचा असला तर सगळ्या जातीधर्मांशिवाय पर्याय नाही. त्यासाठी हे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न सुरू होता. काही जुळवून देत नव्हते. फूट पाडायचा प्रयत्न करत होते. शेवटच्या टप्प्यात आम्ही एकत्र आलोय. आम्हाला आरक्षण देत नाही. या लोकांना मराठा नको, केवळ मराठा मतदानापुरता हवाय. कारखाने, शाळा सगळे या लोकांचे आहेत. आजच नाही पहिल्यापासून आम्हाला हे जगू देत नाही. नेता नको, पक्ष नको, आम्ही कुणाला मोठे करणार नाही. ट्रोलिंगचा फरक नाही. मराठ्यांची पोरं कच्ची नाहीत, मुस्लीम आणि दलित पोरंही आता रपारप सुरू होणार...तुम्ही जे करतायेत तेच आम्ही करतो. निवडणुकीला तुम्हाला अधिकार आहे उभं राहण्याचा तसा आम्हालाही आहे. कोण कुणाला हरवतं ते बघायचं असं चॅलेंजही मनोज जरांगे पाटलांनी महायुती आणि महाविकास आघाडीला दिले. 

तसेच  एक शिक्का चालवायचा. आपल्या जातीची पोरं वाचवायची. एकमेकांच्या अंगावर जायचं नाही. जर शिव्या दिल्या तर लहान भावाने दिल्या समजून पुढे जायचं. दलितांनाही एक शिक्का चालू द्या. वाद घालत बसायचं नाही. तुम्ही एकदिलाने एकत्र राहिला तर ७० वर्षात बघितलेले स्वप्न आता साकार होणार. ४ तारखेपर्यंत मराठा बांधवांना विनंती आहे, कुणीही अंतरवालीकडे येऊ नका. मला मोकळा वेळ द्या. इच्छुकांनी जास्त ताणू नका, एक इच्छुक उभा करायचा आणि इतरांना अनेक संधी आहेत. जिल्हा परिषद, नगरपरिषद, मार्केट, महामंडळे सगळे पुढे आहे. २-२ मंत्री करू, ७-८ उपमुख्यमंत्री करू, मुस्लीम, दलित, धनगर, मराठा, लिंगायत, ओबीसी सर्वांचा उपमुख्यमंत्री करूया. रुसला असाल, नाराज असाल तर सोडून द्या, नवीन परिवर्तनाकडे चला. महाराष्ट्रातले जे राजकारणावरचे अभ्यासक आहे, नियोजन करणारे त्यांनीही या. आजपासून सावध राहा. मुस्लीम, मराठा आणि दलित एकत्र आल्याने घराघरात मराठ्यांना आनंद आहे. आमचं आरक्षण हिसकवणाऱ्यांना सुट्टी नाही. आमच्यावर गोळ्या घालणाऱ्यांना सुट्टी नाही असा इशारा जरांगेंनी दिला. 

दरम्यान, मला आधी १०० एकर सभेला पुरत नव्हते, आता ५०० एकर लागेल, सगळं लफडं एकत्र, सगळी कामं बंद जिथं सभा असेल तिथे सर्वांनी यायचं. एवढी शक्ती दाखवायची. पहिल्याच सभेत अख्खा महाराष्ट्र जळमळून गेला पाहिजे. पहिली सभा जिथं असेल तिथल्या जिल्ह्यातील एकही मराठा, दलित, मुस्लीम घरी नको. जातीवंत मुस्लीम, जातीवंत दलित असाल तर सभेला यायचं. १०० किमी वाहतूक कोंडी झाली पाहिजे. तुफान गर्दी करायची असं आवाहन जरांगेंनी केले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmarathaमराठाMuslimमुस्लीमMaratha Reservationमराठा आरक्षण