"मेरे पास माँ है!’’, अजित पवार यांच्याकडून आईसोबतचा फोटो ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 02:31 PM2024-10-31T14:31:15+5:302024-10-31T14:31:44+5:30
Maharashtra Assembly Election 2024: पक्ष आणि कुटुंबात पडलेल्या फुटीसाठी जबाबदार धरत अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो शेअर करत सूचक संदेश दिला आहे.
अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबामध्ये फूट पडली होती. या फुटीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबीय पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजयीमध्ये लढत झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये काका विरुद्ध पुतण्या अशी लढत रंगणार आहे. येथे काका अजित पवार यांच्याविरुद्ध शरद पवार गटाकडून अजितदादांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच पक्ष आणि कुटुंबात पडलेल्या फुटीसाठी जबाबदार धरत अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो शेअर करत सूचक संदेश दिला आहे.
अजित पवार यांनी आईसोबतचा फोटो ट्विट करत राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माझ्या आणि आईच्या वतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक - युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, असे अजित पवार यांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
माझ्या आणि आईच्या वतीने महाराष्ट्रातील मायमाऊली, शेतकरी, कष्टकरी, युवक - युवती आणि ज्येष्ठ नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 31, 2024
#HappyDiwalipic.twitter.com/nyqQl3OHpi
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत बारामतीमध्ये अजित पवार यांच्यासमोर युगेंद्र पवार यांचं आव्हान असलं तरी त्यांचा खरा सामना हा शरद पवार यांच्याशीच होणार आहे. याआधी लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली होती. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली होती.