Raj Thackeray MNS Candidate List: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली. चौथ्या यादीत पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यात पुण्यातील कसबा पेठ, चिखली, कोल्हापूर उत्तर, केज आणि कलीना या विधानसभा मतदारसंघांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
कसबा पेठ, कोल्हापूर उत्तर मध्ये मनसे उमेदवार कोण?
मनसेने पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून गणेश भोकरे यांना उमेदवारी दिली आहे. विदर्भातील चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या श्वेता महाले यांच्याविरोधात गणेश बरबडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून अभिजित राऊत, बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात रमेश गालफाडे आणि मुंबईतील कलीना विधानसभा मतदारसंघातून संदीप उर्फ बाळकृष्ण हुटगी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राज ठाकरे यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात अविनाश जाधव आणि राजू पाटील या दोघांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर मनसेची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिल्या यादीत एकूण ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती.
तिसऱ्या यादीत मनसेकडून १३ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. यात प्रामुख्याने वरळी विधानसभा, वडाळा, कुर्ला, ओवळा माजिवडा, अमरावती, नाशिक पश्चिम या मतदारसंघाचे उमेदवार घोषणा करण्यात आले.
अमित ठाकरे विधानसभा निवडणूक रिंगणात
आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता अमित ठाकरे हेही विधानसभा निवडणूक लढवत आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असून, ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश शिंदे, सदा सरवणकर आणि अमित ठाकरे अशी तिहेरी लढत या मतदारसंघात होण्याची शक्यता आहे.