- महेश घोराळेमुंबई - गेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १०१ उमेदवार रिंगणात उतरविले होते. यापैकी एक उमेवार निवडूण आला होता. १२ लाखांहून अधिक म्हणजे २.२५ टक्के मते मिळविली होती. यंदा ३८ अधिक म्हणजे १३९ उमेदवार मनसेने रिंगणात उतरविले आहेत. त्यामुळे यंदा किती जण निवडून येतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
या ठिकाणी १० उमेदवार होते दुसऱ्या स्थानावर भिवंडी ग्रामीण, डोंबिवली, ठाणे, मागाठाणे, मुलुंड, भांडुप पश्चिम, घाटकोपर पूर्व, माहीम, शिवडी व कोथरूड या दहा विधानसभा मतदारसंघात गेल्यावेळी मनसेचे उमेदवार दुसऱ्या स्थानी होते. तर २५ मतदारसंघांमध्ये मनसे तिसऱ्या स्थानी होती.
२००९ मध्ये मोठे यश - २००७ मध्ये मनसे पहिल्या महापालिका निवडणुकांना सामोरे गेली. त्यानंतर २००९ मधील विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार राज्यात निवडून आले होते.- २०१० मध्ये पक्षाला निवडणूक लढण्यास अधिकृत निशाणी देण्यात आली.