मुंबई - येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणूक लढवत असून आतापर्यंत ४ उमेदवार याद्या मनसेने जाहीर केल्यात. आज मनसेची पाचवी उमेदवार यादी घोषित झाली असून त्यात कोल्हापूर, बीड, नागपूर, रायगड, सोलापूर जिल्ह्यातील काही जागांचा समावेश आहे.
मनसेच्या पाचव्या यादीत कोणाचा समावेश?
पनवेल - योगेश चिलेखामगाव - शिवशंकर लगरअक्कलकोट - मल्लिनाथ पाटीलसोलापूर शहर मध्य - नागेश पासकंटीजळगाव जामोद - अमित देशमुखमेहकर - भय्यासाहेब पाटीलगंगाखेड - रुपेश देशमुखउमरेड - शेखर टुंडेफुलंब्री - बाळासाहेब पाथ्रीकरपरांडा - राजेंद्र गपाटउस्मानाबाद - देवदत्त मोरेकाटोल - सागर दुधानेबीड - सोमेश्वर कदम श्रीवर्धन - फैझल पोपेरेराधानगरी - युवराज येडुरे
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील जवळीक गेल्या काही महिन्यांत वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळेच की काय कोपरी-पाचपाखाडी, अंबरनाथ, कल्याण (पूर्व) अशा काही विधानसभा मतदारसंघांत संधी असूनही मनसेने शिंदेसेनेविरुद्ध उमेदवार दिले नसल्याचे मत राजकीय निरीक्षकांमध्ये व्यक्त होत आहे. डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरोधातही उमेदवार दिलेला नसल्यामुळे महायुतीचे नेते व मनसे यांच्यात छुपी युती झाल्याची चर्चाही येथे सुरू आहे.