Maharashtra Assembly Election 2024 :महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी विक्रमी मतदान पार पडलं आहे. विधानसभेच्या २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत एकूण ६५.११ टक्के मतदान झालं आहे. गेल्या ३० वर्षांमध्ये पहिल्यांदाच राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांधिक ७६.२५ टक्के एवढं मतदान झालं. तर मुंबई शहर ५२.०७ टक्के आणि मुंबई उपनगर ५५.७७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानासाठी उदासीनता पाहायला मिळाली. महत्त्वाचे म्हणजे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात ७३.६८ टक्के इतकं विक्रमी मतदान झालं आहे. राज्यातील २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभेला मतांची टक्केवारी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. मतदानासाठी काही तास उरले असताना नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला आहे. तर मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सारख्या शहरी भागांमध्ये कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री उशीरा आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ६५.११ टक्के मतदान झालं आहे.
मात्र राज्यात २५ असे मतदारसंघ आहेत त्यामध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदाना झालं आहे. तर २५ मतदारसंघ असे आहेत ज्यामध्ये ५३ टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वांधिक मतदान झाल्याचे समोर आलं आहे. तर मुंबईतल्या अनेक मतदारसंघामध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद झाली आहे.
सर्वाधिक मतदान झालेले २५ मतदारसंघ
84.79 टक्के करवीर81.75 टक्के चिमूर81.72 टक्के कागल80.54 टक्के ब्रह्मपुरी80.00 टक्के सिल्लोड79.89 टक्के नेवासा79.04 टक्के शाहूवाडी79.02 टक्के पलूस-कडेगाव78.70 टक्के नवापूर78.47 टक्के शिराळा78.26 टक्के राधानगरी78.06 टक्के शिरोळ77.90 टक्के सांगोला77.75 टक्के दिंडोरी77.75 टक्के विक्रमगड77.64 टक्के कोरेगाव77.20 टक्के भोकरदन77.06 टक्के घनसावंगी76.95 टक्के पैठण76.55 टक्के अलिबाग76.26 टक्के कराड दक्षिण76.10 टक्के इंदापूर76.06 टक्के खामगाव75.99 टक्के उरण75.73 टक्के माढा
सर्वात कमी मतदान झालेले मतदारसंघ
44.49 टक्के कुलाबा47.75 टक्के अंबरनाथ48.76 टक्के मुंबादेवी49.20 टक्के भिवंडी पूर्व49.70 टक्के धारावी50.07 टक्के चांदिवली50.11 टक्के हडपसर50.36 टक्के वांद्रे पश्चिम50.90 टक्के शिवाजीनगर51.20 टक्के वर्सोवा51.29 टक्के पिंपरी51.43 टक्के सायन कोळीवाडा51.50 टक्के ऐरोली51.76 टक्के मीरा भाईंदर52.00 टक्के मानखुर्द शिवाजीनगर52.01 टक्के मुंब्रा-कळवा52.18 टक्के कोथरूड52.25 टक्के ओवळा-माजिवडा52.53 टक्के मलबार हिल52.66 टक्के कलिना52.75 टक्के कुर्ला52.78 टक्के वरळी52.80 टक्के जळगाव शहर52.85 टक्के पुणे कॅन्ट53.00 टक्के अंधेरी पश्चिम