शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
2
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
3
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
4
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
6
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
7
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?
8
मविआत सारे आलबेल? मातोश्रीवरची बैठक सोडून आदित्य ठाकरे, अनिल परब शरद पवारांच्या भेटीला 
9
आदिवासी महिलेने मोदींना का पाठवले १०० रुपये?; पंतप्रधानांनीच सांगितलं कारण, म्हणाले...
10
निलेश कराळे मास्तर विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक, या दोन मतदारसंघांवर ठोकला दावा
11
Video: आरतीचं ताट, बुके अन् हार; Bigg Boss फेम अरबाज पटेलचं असं झालं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वागत
12
Supriya Sule : "खुद्द मावळते मुख्यमंत्री आणि त्यांचा पक्ष..."; सुप्रिया सुळे यांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
13
“मनोज जरांगे ज्या मतदारसंघातून निवडणूक लढतील, तिथे आव्हान देणार”; लक्ष्मण हाकेंचा एल्गार
14
“आरक्षण कसे देत नाही ते बघूच, सरकारची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही”; मनोज जरांगे आक्रमक
15
IND vs NZ : "आम्ही प्रयत्न केला पण...", लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माची रोखठोक उत्तरं
16
RSS च्या कार्यक्रमात बाप-लेकाचा चाकू हल्ला, 10 जण जखमी; आरोपीच्या घरावर बुलडोझर...
17
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
18
'भगवा दहशतवाद'वर सुशीलकुमार शिंदेंनी मान्य केली चूक; म्हणाले, 'पक्षाने सांगितले, तेच बोललो'
19
WTC Points Table : टॉपर टीम इंडियाला मोठा धक्का; फायनलचा मार्ग खडतर होण्याची भीती
20
Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले

“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 12:53 PM

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे. कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन अजित पवार गटातील नेत्यांनी केले आहे.

Maharashtra Assembly Election 2024 Ladki Bahin Yojana: राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्ष जागावाटप अंतिम करून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यावर भर देत आहेत. यातच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. आयोगाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिल्याने ही योजना बंद होणार, अशीही चर्चा सुरू झाली आणि गोंधळ निर्माण झाला. अजित पवार गटातील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देताना विरोधकांच्या फसवणुकीला बळी पडू नका, असे आवाहन जनतेला केले आहे. 

निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेला स्थगिती दिल्याचे समजते आहे. या मुद्द्यावर विरोधक तुम्हाला फसवायचे काम करतील. लाडकी बहीण योजना जुलै महिन्यात सुरु झाली. योजनेचा आता चौथा महिना चालू आहे. चार महिन्याचे ६ हजार रुपये मिळायला हवे होते. पण आमच्या भगिनींना ७ हजार ५०० रुपये मिळाले. हे जास्तीचे १५०० रुपये तुम्हाला पुढच्या महिन्याचे दिलेले आहेत. सरकारला हे माहिती होते की, निवडणूक आयोग निवडणूक काळात आचारसंहितेच्या नावाखाली या योजनेला बंदी घालेल. त्यामुळे आम्ही आधीच मंत्रिमंडळात निर्णय घेऊन एक महिन्याचे आगाऊ पैसे दिले. निवडणूक झाली की, पुन्हा ते पैसे तुम्हाला मिळत राहतील. त्यामुळे कोणीही फसवणूक करण्याचा प्रयत्न करील, तो प्रयत्न यशस्वी होऊ देऊ नका, असे दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. 

याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे

ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत, असे फार थोडेसे लोक राहिले आहेत. सगळ्यांचे पैसे अकाउंटमध्ये गेलेले आहेत. ९८ टक्के पेक्षा जास्त आमच्या महिला भगिनींना मिळाले आहेत. ही आमची कायम स्वरूपी योजना आहे. निवडणुकीसाठी आणलेली ही योजना नाही. त्यामुळे याचा लाभ महिलांना मिळतच राहणार आहे, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार !! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती, असे आवाहन अदिती तटकरेंनी केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाNCPराष्ट्रवादी काँग्रेसState Governmentराज्य सरकार