शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 12:04 PM

Maharashtra Assembly Election 2024 : काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली.

Maharashtra Assembly Election 2024 :  बारामती : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी मागील २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी संध्याकाळी पाच वाजता थंडावल्या. विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानाच्या अगोदरच राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत. काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना घडली. तर दुसरीकडे बारामतीमध्ये सुद्धा सोमवारी रात्री मोठी घडामोड घडली.

राज्यातील सर्वात मोठी हायव्होल्टेज लढत असलेल्या बारामती मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांना त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आव्हान दिले आहे. त्यामुळे याठिकाणी विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. अशातच सोमवारी (दि.१९) रात्री युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबवली. अजित पवार यांचे बंधू आणि युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्सच्या बारामती शोरूममध्ये रात्री पोलिसांची शोध मोहीम राबविली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री श्रीनिवास पवार यंच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी शोध मोहीम राबविली. रात्री पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या शोरुममध्ये काय सापडलं, नेमकं कोणत्या कारणाने ही शोध मोहीम राबवण्यात आली, याची माहिती समोर आली नाही. मात्र, या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाले युगेंद्र पवार?याबाबत युगेंद्र पवार म्हणाले की, रात्री १० वाजण्याच्या सुमारास शो रुम ऑफिसमधून फोन आला. त्यावेळी आपल्याकडे पोलिसांचे एक पथक आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावर मी पोलिसांना सहकार्य करण्याची सूचना तेथील कर्मचाऱ्यांना दिली. आम्ही काहीच चुकीचं करत नव्हतो, त्यामुळे पोलिसांना काहीच सापडलं नाही. मात्र, बारामतीचे राजकारण या पातळीवर आले असेल तर दुर्देव आहे.

काय म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी?बारामती येथील शरयू शोरूमवर रात्री शोध मोहीम राबवण्यात आली. या संदर्भात बारामती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी माहिती देताना सांगितले की, यासंदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी मिळाल्या होत्या. त्यानुसार, आम्ही या ठिकाणी शोध मोहीम राबवली. तसेच, या परिसरात कुठल्याही प्रकारची रक्कम आढळून आली नाही, असेही निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीyugendra pawarयुगेंद्र पवारAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार