शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार घराण्यात कटुता; दूर होईल असे वाटत नाही; अजित पवार यांनी प्रथमच व्यक्त केले मत
2
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
3
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
4
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
5
Niva Bupa Health IPO : ₹७४ च्या शेअरनं दिला ६% लिस्टिंग गेन; पण जून तिमाहीत थंड होता निवा बुपाचा व्यवसाय, शेअरची स्थिती काय?
6
केंद्रीय मंत्र्यांनी केलं वाचनालयातील पंख्याचं उदघाटन, आता फोटो होताहेत व्हायरल   
7
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
8
Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
9
अमित ठाकरे यांना मतदान का करावे? ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितले 'हे' 10 मुद्दे
10
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
11
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
12
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
13
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
14
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
15
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
16
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
17
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
18
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
19
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
20
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!

'सजग रहो..' महाराष्ट्राच्या रणांगणात घरोघरी प्रचार; RSS ची रणनीती, महायुतीला फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 10:44 AM

एकीकडे मुस्लीम समाजाकडून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे महायुतीच्या प्रचारासाठी हिंदू विचारधारी संघटना एकवटल्या आहेत. 

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यात मतदारांना आकर्षिक करण्यासाठी राजकीय पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. एका विशिष्ट समाजाच्या मतदानासाठी फतवा काढला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे तर दुसरीकडे घरोघरी पोहचून प्रचार केला जातोय. मतांचे धुव्रीकरण करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. मुस्लिम संघटना आणि मौलवींकडून महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यावर व्होट जिहादचा आरोप महायुतीकडून केला जात आहे. त्यानंतर आता हिंदू मतांना एकजूट करण्यासाठी संघ परिवारही मैदानात उतरला आहे.

निवडणुकीच्या सुरुवातीपासून संघ परिवाराकडून महाराष्ट्रातील सलग्न संघटना आणि प्रचारकांच्या छोट्या छोट्या बैठका सातत्याने घेतल्या जात आहेत. आता या बैठकांना आणखी वेग आला आहे. घरोघरी जात हिंदू मतदारांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात आरएसएसनं सजग रहो हे अभियान सुरू केले आहे. त्यात संघाचे ३३ प्रचारक आणि संघ विचारसरणीच्या जवळपास १०० संघटनांना ग्राऊंडवर उतरल्या आहेत. 'सजग रहो' मोहिमेत सहभागी झालेल्या संस्थांचे नेतृत्व चाणक्य प्रतिष्ठान, मातंग साहित्य परिषद, रणरागिणी आणि सेवाभावी संस्था करत आहेत. या सर्व संघटना महाराष्ट्रातील चार प्रादेशिक विभागात (कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ) सक्रिय आहेत. 

महाराष्ट्रात मराठी मुस्लिम सेवा संघाच्या नेतृत्वाखाली १८० हून अधिक स्वयंसेवी संस्था मुस्लीम मतदारांना एकत्र करण्यासाठी रात्रंदिवस काम करत असल्याची माहिती RSS ला मिळाली आहे. या संस्था मुस्लीम मतदारांची नावे यादीत टाकण्यापासून मतदानापर्यंत सर्व काम करणार आहेत. या संघटनांच्या सक्रियतेमुळे २०२४ मध्ये मुस्लिम मतदारांची मतदानाची टक्केवारी १५% वाढली आहे. त्यामुळे आधीच कार्यरत असलेल्या संघाने आपली ताकद दुप्पट करून हिंदू मतदारांना एकत्र करण्यासाठी अहोरात्र काम सुरू केले आहे. यातच भाजपाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या वक्तव्यातून हिंदू समाजाला इशारा देऊन मतांचे ध्रुवीकरण सुरू केले आहे. आरएसएसची 'सजग रहो' ही मोहीम त्याचाच एक भाग आहे. यामध्ये पंतप्रधान मोदींचा ' एक है तो सेफ है' आणि योगींच्या 'एक है तो नेक है' या घोषणा देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, बांगलादेशी घुसखोरी आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रभावाबाबतही ‘सजग रहो’ मोहिमेद्वारे लोकांना सावध केले जात आहे. याशिवाय, विहिंप आणि बजरंग दल या आरएसएसच्या सहकारी संघटना महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. जातिभेदापासून दूर राहून हिंदू म्हणून मतदानात सहभागी होण्याचे आवाहनही ते करत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत संघ आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांमध्ये परस्पर समन्वय ठेऊन समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात आरएसएस आणि त्याच्या विविध घटकांनी आतापर्यंत अनेक बैठका घेतल्या आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीHinduहिंदूMuslimमुस्लीम