राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये सत्ताधारी महायुतीने जोरदार मुसंडी मारली होती. तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीची अनपेक्षित अशी पिछेहाट झाली होती. दरम्याान, महाविकास आघाडीमधील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसची विधानसभा निवडणुकीत दाणादाण उडाली असून, पक्षाला केवळ १६ जागांवर समाधान मानावं लाागलं. काँग्रेसला विदर्भातून सर्वाधिक यश मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र तिथेहे पक्षाचं पानिपत झालं. तर भाजपाने काँग्रेसच्या अनेक जागा हिसकावून घेतल्या. आता भाजपाचे नवनिर्वाचित आमदार आशिष देशमुख यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. काँग्रेसमधील आमदारांनी आता भाजपामध्ये विलीन व्हावं, असा सल्ला आशिष देशमुख यांनी दिला आहे.
काँग्रेसवर टीका करताना आशिष देशमुख म्हणाले की, काँग्रेसचे नेते हे मुख्यमंत्रिपदासाठी आपापसात भांडत होते. त्यांच्यामध्ये कुठलाही समन्वय दिसलला नाही. पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा बाळासाहेब थोरात असलील, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेली लोकं पराभूत झाली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभन केवळ २०८ मतांनी टळला. विधानसभा निवडणुकीचा लागलेला हा निकाल काँग्रेससाठी लाजिरवाणा आहे. त्यामुळे आता काँग्रेसच्या आमदारांनी भाजपामध्ये विलीन व्हावं, अशी माझी त्यांना विनंती आहे.
दरम्यान, आशिष देशमुख यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे बडे नेते सुनील केदार यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं होतं. आशिष देशमुख यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अनुजा केदार यांचा २६ हजार ४०१ मतांनी पराभव केला होता.