शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

हिंमत असेल तर पोलीस बाजूला हटवा, अन्...; अबू आझमींचं राज ठाकरेंना खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 14:38 IST

मशि‍दीतून महाविकास आघाडीला मते करण्यासाठी फतवे काढले जातायेत, सत्ता आल्यास ४८ तासांत भोंगे हटवू असं विधान राज ठाकरेंनी केले त्यावर अबू आझमींनी पलटवार केला आहे. 

मुंबई - आयुष्यात राज ठाकरेंचं सरकार येणार नाही. अशी विधाने करणार्‍यांचे सरकार कधीही येऊ शकत नाही. हा देश पुरोगामी आहे. कोणी 'माई का लाल' अशाप्रकारे कायद्याचं उल्लंघन करून मशिदीतील भोंगे काढू शकत नाही. पोलिसांना बाजूला हटवा, कुठल्याही मशिदीत येण्याची हिंमत करून दाखवा असं खुलं चॅलेंज समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंना दिले आहे.

सत्ता आली तर ४८ तासांत मशि‍दीवरील भोंगे हटवू असं विधान राज ठाकरे यांनी केले होते, त्यावरून अबू आझमी म्हणाले की, राज ठाकरेंनी पोलीस बाजूला हटवून मुंबईतल्या कुठल्याही मशिदीत येऊन दाखवावं. मानखुर्द शिवाजीनगरच्या मशिदीत या भोंगे हटवून दाखवा, तुम्ही स्वत:ला काय समजता, मुस्लीम सक्षम नाहीत? तुम्ही आम्हाला चॅलेंज करू नका. आम्ही कधी मंदिरात घुसून लाऊडस्पीकर उतरवू हे बोललो नाही. मंदिरावाल्यांना मारणार नाही बोललो. फालतू गोष्टी करू नका असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

तर महाविकास आघाडी ही मुस्लीम लीग नाही. मुस्लिमांची वेगळी पार्टी नाही. महाविकास आघाडीत काँग्रेस,  शरद पवार, उद्धव ठाकरे आहेत. जे या देशातील आहेत, त्यांना पाठिंबा दिला जात आहे. आम्ही मुस्लिमांचा पक्ष बनवत नाही. ज्या लोकांनी अत्याचार केले ते आमच्याकडून मतांची अपेक्षा कशी करता, यांना दु:ख का होतंय. व्होट जिहाद, लव्ह जिहाद, लँड जिहाद यासारख्या गोष्टी बोलल्या जातात. पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्रिपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशाप्रकारे भाषा वापरणे हे योग्य नाही. मी परळ लालबागला उभा राहिलो तर मला मते मिळतील का, प्रत्येकाची आपापली व्होटबँक असते. त्यांच्याकडे मते मागितली जातात. याचा त्रास इतरांना व्हायला नको असंही अबू आझमी यांनी म्हटलं. 

दरम्यान, महायुती आणि राज ठाकरेंकडे काही मुद्दे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे सरकार महाविकास आघाडी आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही महायुतीने भ्रष्टाचार केला. अशा लोकांना लाज वाटायला पाहिजे. जनतेला मूर्ख बनवण्याचं काम भाजपा करत आहेत. केंद्रीय गृहमंत्रिपदी असलेला व्यक्ती लोकांची दिशाभूल करणारी विधाने करतो. वक्फ बोर्डाची जमीन ही आमच्या पूर्वजांनी मशीद, मदरसा, दर्गा, हॉस्पिटल यांना दिलेल्या जमिनी आहेत. त्या जमिनीवर सरकारने कब्जा केला आहे. त्यावर सरकारी कार्यालये, पोलीस स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालये उभारली. ही आमची जमीन आहे त्या हडपल्या आहेत. जनतेची दिशाभूल करणारे विधाने भाजपाकडून केली जात आहेत असा आरोप अबू आझमींनी केला.

...तर सरकार ताडकन् कोसळेल 

अबकी बार ४०० पार बोलणारे २३० वर आले, २ कुबड्या घेऊन सरकार चालतंय. जर या कुबड्या काढल्या तर सरकार ताडकन् कोसळेल. राज्यात महाविकास आघाडी सरकार येईल त्यानंतर यांचा पत्ता साफ होईल. २०१४ च्या आधी देशात बुरखा बंदीची भाषा झाली होती का? गाय-बैलाच्या नावाने मुस्लिमांना मारहाण व्हायची का, मॉब लिचिंगचे प्रकार याआधी व्हायचे का, गरीब मुस्लिमांना एकटं पकडून त्यांना दाढीवरून अल्लाहला शिवी द्या, जय श्री राम बोला असं जबरदस्तीने बोलायला लावायचे का या सर्व गोष्टी देशात घडतायेत. त्यामुळे केवळ उलेमा नाही तर देशातील सर्व लोक जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतात. त्यांचे अनुयायी आहेत त्यांनी यांच्याविरोधात एकत्र यायला हवं. भाजपा कोणाला वेड्यात काढू शकत नाही असं अबू आझमींनी सांगितले आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४mankhurd-shivaji-nagar-acमानखुर्द शिवाजी नगरmumbai regionमुंबई विधानसभा निवडणूकAbu Azmiअबू आझमीRaj Thackerayराज ठाकरेMuslimमुस्लीमBJPभाजपा