- दीपक शिंदे सातारा - पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या विरोधात उद्धवसेनेने हर्षद कदम यांना उमेदवारी दिलेली आहे तर शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होणार असल्याने शंभूराज देसाई यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पाटण मतदारसंघात देसाई आणि पाटणकर हे दोन गट मजबूत आहेत.
शंभूराज देसाई यांनी पक्ष वाढविण्याऐवजी आपला गट वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मूळ शिवसैनिक हे शंभूराज देसाई यांच्यावर नाराज आहेत. ते हर्षद कदम यांना मदत करतील. यामुळे यावेळीची विधानसभा निवडणूक ही देसाई यांना अधिक जड जाण्याची शक्यता राजकीय अभ्यासक व्यक्त करीत आहेत. पाटणकर यांना आता नवीन चिन्ह घेऊन लोकांमध्ये जायचे असल्याने ते किती मतदारांपर्यंत पोहचतात हे महत्वाचे ठरणार आहे.
पाच वर्षांत काय घडले अन् बिघडले- मागील पाच वर्षात शंभूराज देसाई यांनी पाटणकर यांच्याकडील बऱ्याचशा ग्रामपंचायती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी जाईल असे त्यांना वाटत आहे.- सत्यजित पाटणकर यांनी देखील आपला जुना गट पुन्हा सक्रिय केला आहे.- शरद पवार यांनी हा मतदारसंघ उद्धव सेनेला सोडल्यामुळे शिवसेनेच्या मतांमध्ये विभागणी
निवडणुकीतील कळीचे मुद्दे‘शंभूराज देसाई यांनी मूळ शिवसेना पक्ष सोडून ते शिंदेसेनेत गेल्याचे शिवसैनिकांना रुचलेले नाही.पाटणमधील विकासाचा दावा मात्र, अनेक विकासकामे अर्धवटच आहेत. कोयना धरणग्रस्त नागरिकांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत.बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेले सत्यजित पाटणकर यांचा मतदारसंघात जनसंपर्क कमी.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय ?- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे यांना अधिक मते मिळाली. - खासदार उदयनराजे भोसले यांना ७५ हजार ४६० तर शशिकांत शिंदे यांना ७८ हजार ४०३ मते मिळाली होती. लोकसभेला उदयनराजेंबद्दल सुरुवातीच्या टप्प्यात असहकाराची भूमिका होती. नंतर त्यामध्ये बदल झाला.