शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा' आदित्यसाठी राज ठाकरेंना पाठिंबा मागितला नव्हता; महेश सावंत यांचा खोचक टोला
2
समीकरण जुळले, आता ३ तारखेला जागा अन् उमेदवार ठरणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
3
भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल यांची अमेरिकेशी महत्त्वाची चर्चा, देशाच्या सुरक्षेसंबंधी बोलणी
4
पीएम मोदींनी कच्छमध्ये जवानांसोबत साजरी केली दिवाळी, स्वतःच्या हाताने मिठाई खाऊ घातली
5
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
6
जबरदस्त तिमाही निकालानंतर 'हा' शेअर सुस्साट; घसरत्या बाजारातही जोरदार तेजी
7
IND vs NZ : फक्त २ षटकार अन् Yashasvi Jaiswal च्या नावे होईल वर्ल्ड रेकॉर्ड
8
राऊतांसाठी भुई चक्कर, ठाकरेंसाठी सुरसुरी तर शिंदे-फडणवीसांसाठी...; संजय शिरसाट कोणत्या नेत्यासाठी कोणता फटाका करणार खरेदी?
9
अजित पवारांनी सांगितलं तर उमेदवारी मागे घेणार का?; नवाब मलिक म्हणाले...
10
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
11
५ वेळा फेल... शेवटच्या प्रयत्नात मिळालं यश; ब्यूटी विद ब्रेन IAS ऑफिसरने 'अशी' केली कमाल
12
"मेरे पास माँ है!’’, अजित पवार यांच्याकडून आईसोबतचा फोटो ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा
13
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
14
Laxmi Pujan 2024: एका व्हायरल व्हिडिओनुसार लक्ष्मीपूजेत घंटानाद करू नये; त्यामागचे वास्तव जाणून घेऊ!
15
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
16
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
17
November Born Astro: नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक म्हणजे सुप्त ज्वालामुखी; वाचा गुण-दोष!
18
धक्कादायक! ज्याला भाऊ मानायची, त्यानेच महिलेचे 6 तुकडे करुन घराबाहेर पुरले...
19
MI रोहितची मर्जी राखणार; हार्दिकची कॅप्टन्सी धोक्यात! 'ऑल इज वेल' सीनसाठी असा काढलाय तोडगा?
20
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत

...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 1:00 PM

Maharashtra Assembly Election 2024: शिवसेना शिंदे गटाचे पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात येण्यामागचं नेमकं कारण दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे

शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी २०२२ साली झालेल्या बंडानंतर सोबत आलेल्या जवळपास सर्वच आमदारांना विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. मात्र पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या जागी राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या श्रीनिवास वनगा यांना माध्यमांसमोर अश्रू अनावर झाले होते. तसेच उमेदवारी नाकारण्यात आल्याने श्रीनिवास वनगा हे मागच्या दोन अडीच दिवसांपासून नॉट रिचेबल होते. दरम्यान, श्रीनिवास वनगा यांना शिंदे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात येण्यामागचं नेमकं कारण दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे.

श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देण्याच्या शिंदे गटाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर यांनी सांगितले की, श्रीनिवास वनगा यांची जागा धोक्यात असल्याने त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली नाही.  ज्या ज्या लोकांना काही कारणामुळे मुख्यमंत्री उमेदवारी देऊ शकले नाहीत त्यामध्ये भावना गवळी यांचाही समावेश होता. त्या चारवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तरीही लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर अन्याय झाला होता. मात्र नंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेचं आमदार केलं. तसंच श्रीनिवास वनगा यांनाही करणार. आमचे मुख्यमंत्री कुणावरही अन्याय करत नाहीत. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला असं श्रीनिवास वनगा यांनी वाटून घेऊ नये. त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घ्यावी. १०० टक्के पुढच्या विधान परिषद आमदारांच्या यादीत त्यांचं नाव असेल, असे दीपक केसरकर म्हणाले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर नॉट रिचेबल झालेले  श्रीनिवास वनगा हे अद्यापही संपर्काबाहेरच आहेत. काल पहाटे ते घरी आले होते. मात्र कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा नॉट रिचेबल झाले होते. दरम्यान, ते आता घरी परतले असून, मला आता आरामाची गरज आहे, असं त्यांनी सांगितल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shiv Senaशिवसेनाpalghar-acपालघरDeepak Kesarkarदीपक केसरकर