शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 3:18 PM

जे लोकसभेला घडले तेच विधानसभेला घडेल, बारामती शरद पवारांची होती आणि त्यांचीच राहील असा विश्वास श्रीनिवास पवारांनी व्यक्त केला. 

बारामती - आईवर मुंबईत उपचार सुरू होते, ८ दिवस उपचार थांबवून तिला बारामतीत आणलं असं सांगत श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर मोठा आरोप केला आहे. 

श्रीनिवास पवार यांनी एका मुलाखतीत म्हटलं की, माझ्या आईचे वय ८७ आहे. प्रचाराच्या आदल्या दिवशी तिला मुंबईहून आणलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत. उपचार थांबवून तिला इथं आणलं. मी भेटायला गेलो होतो तेव्हा मला त्रास होतोय असं ती म्हणाली. बारामतीत तशी चर्चा होती आईला सभेत आणणार आहे. मी तिला विचारलं, माझ्या कानावर आलंय तू सभेला जाणार आहेस. त्यावर तिने सांगितले, मला २ पाऊले चालवत नाही. खूप त्रास होतोय, मी काही जाणार नाही. मी तिला सांगितले जे काही होईल ते होईल तू काही मनाला लावून घेऊ नकोस. ठराविक वयानंतर बऱ्याच गोष्टीत दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मला काही बोलायचे नाही. २५ तारखेला आई मुंबईला जाईल आणि उरलेली ८ दिवसांची ट्रिटमेंट पूर्ण करेल. आईला त्रास होईल म्हणून मी राजकारणाचं काही बोलत नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच अजित पवार कौटुंबिक कार्यक्रमाला येणे टाळतात. दिवाळीला आला नाही. साहेबांकडे दिवाळी कार्यक्रम होतो तिथे आला नाही. त्यामुळे कौटुंबिक वेळी अजित पवारांची भेट झाली नाही. राजकारणावर आम्ही बोलत नाही. मोठी बहीण ही दादाचे व्यवसाय बघते, दादाचे जे काही साखर कारखाने आहेत ते सांभाळते, त्यामुळे तिची काही मजबुरी असेल असं सांगत मोठी बहीण दादांच्या प्रचाराला दिसण्यामागचं कारण श्रीनिवास पवारांनी सांगितले. 

दरम्यान, पवार कुटुंब एकजूट होतं त्यात फूट पाडण्यात विरोधक यशस्वी झाले. अजितदादा भाजपासोबत गेले, तात्यासाहेब पवारांचे घर फोडले असं त्याने म्हटलं. आम्ही दोघे भाऊ आहे. मीपण तात्यासाहेब पवारांचा मुलगा आहे पण मी असे काही म्हणत नाही.  मी साहेबांना जन्मापासून ओळखतो. तोही ओळखतो पण आता तो वेगळे बोलायला लागला आहे. गेली ३५ वर्ष ज्या साहेबांनी पदे दिली, त्यांच्यावर घर फोडल्याचा आरोप करताना पदे देताना आठवले नाही. बारामती ही शरद पवारांची आणि त्यांचीच आहे. जे लोकसभेला घडले तेच विधानसभेला घडेल असा विश्वास श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४baramati-acबारामतीwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस