शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 6:49 AM

Maharashtra Assembly Election 2024 : माघार कोण घेणार याकडे लक्ष, माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान; काही ठिकाणी एकाच गटातील दोन-दोन ‘अधिकृत उमेदवारी’

- दीपक भातुसे

Maharashtra Assembly Election 2024 : मुंबई : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी कुठला पक्ष किती आणि कोणत्या जागा लढवणार हे जाहीर करणाऱ्या महायुतीमहाविकास आघाडीला विधानसभेच्या जागावाटपाचा घोळ शेवटपर्यंत मिटवता आला नाही. एक तर २८८ मतदारसंघ आणि त्यात एका मतदारसंघावर एकापेक्षा जास्त मित्रपक्षांनी दावा सांगितल्याने शेवटपर्यंत दोन्हीकडून कोण किती आणि कोणत्या जागा लढवणार हे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नाही.

गोंधळामुळे महायुती आण मविआत काही मतदारसंघावर दोन-दोन उमेदवार रिंगणात असून दोन्हीकडील काही जागांचा हिशेबच लागत नाही. कदाचित उमेदवार अधिकृतपणे जाहीर न करताच दोन्हीकडून एबी फॉर्म दिले गेले असण्याची शक्यता आहे. मंगळवारी अखेरच्या काही तासांपर्यंत महायुतीकडून उमेदवारी याद्या प्रसिद्ध करण्यात येत होत्या.

दोन्ही आघाडी, युतीचे चर्चेचे गुऱ्हाळ एवढे प्रदीर्घ चालले की, शेवटचा दिवसही याद्या प्रसिद्ध करण्याचाच होता. तिन्ही पक्षांना अंदाज असल्याने आपापल्या उमेदवाराकडे एबी फॉर्म पोहोचेल याची सोय करण्यात आली होती. घोळ होऊन दोन-दोन उमेदवारांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर अर्ज भरले आहेत. अंतिम चित्र आता अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल.

गोंधळामुळे अनेक मतदारसंघात मित्रपक्षांतच लढतमविआ : मित्रपक्षांत लढतपरांडा : शरद पवार गटाकडून राहुल मोटे, उद्धव सेनेकडून रणजित पाटीलपंढरपूर : शरद पवार गटाकडून अनिल सावंत, काँग्रेसकडून भगीरथ भालकेदिग्रस : काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, उद्धव सेनेकडून पवन जयस्वालधारावी : काँग्रेसकडून ज्योती गायकवाड, उद्धवसेनेकडून बाबूराव माने

मविआत लहान घटक पक्षांंशी लढतमविआने घटक पक्षांना काही मतदारसंघ सोडले, तर काही मतदारसंघात उमेदवारही उभे केले आहेत. कळवण, डहाणू माकपला, भिवंडी पूर्व सपाला सोडले. मात्र मित्रपक्षांच्या काही मतदारसंघात मविआतील उमेदवार आहेत. मानखुर्द : सपाकडून अबू आझमी, उद्धव सेनेकडून राजेंद्र वाघमारेसोलापूर शहर मध्य : काँग्रेसकडून चेतन नरोटे, तर मित्रपक्ष असलेले माकपकडून नरसय्या आडमसांगोला : उद्धव सेनेकडून दीपक आबा साळुंखे, तर मित्र पक्ष असलेल्या शेकापकडून बाबासाहेब देशमुख लोहा कंधार : उद्धव सेनेकडून एकनाथ पवार, शेकापकडून आशा शिंदे.

महायुती : मित्र पक्षांत लढतमोर्शी : अजित पवार गटाकडून देवेंद्र भुयार, भाजपकडून उमेश यावलकर आष्टी : अजित पवार गटाकडून बाळासाहेब आजबे, भाजपकडून सुरेश धसश्रीरामपुर : अजित पवार गटाकडून लहू कानडे, शिंदे सेनेकडून भाऊसाहेब कांबळेदिंडोरी : अजित पवार गटाकडून नरहरी झिरवाळ, शिंदे सेनेकडून धनराज महालेदेवळाली : अजित पवार गटाकडून सरोज अहिरे, शिंदे सेनेकडून राजश्री अहिररावअणुशक्तीनगर : अजित पवार गटाकडून नवाब मलिक, शिंदे सेनेकडून सुरेश पाटील

कोण किती जागा लढवणार?मविआ : काँग्रेस - १०३, ठाकरे - ९६, शरद पवार ८७ असे मविआचे २८६ उमेदवार रिंगणात आहेत. दोन मतदारसंघांचे काय ते स्पष्ट होत नाही, दुसराकडे चार ठिकाणी मित्र पक्षांच्या उमेदवारांचा गोंधळ आहे. महायुती : भाजप - १४८+४ (मित्रपक्ष), शिंदे सेना - ८०, अजित पवार गट ५२ असे महायुतीचे २८४ उमेदवार रिंगणात. चार मतदारसंघांचे काय ते स्पष्ट होत नाही, तर सहा मतदारसंघात मित्र पक्षांच्या उमेदवारांचा गोंधळ आहे.

मंत्री गावितांनी भरला अपक्ष अर्ज आणि अफवांचे पीकनंदुरबार : नंदुरबार मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून पक्षाने एबी फॉर्म परत मागितल्याची चर्चा होती. तसा कॉलही प्रदेश कार्यालयातून त्यांना आल्याचे सांगितले जात होते. मात्र, पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सावधगिरी म्हणून आपण अपक्ष अर्ज भरल्याचे त्यांनीच स्पष्ट केले आणि या चर्चेवर पडदा पडला आहे.

संगमनेर मतदारसंघात थोरात-विखे सामना नाहीअहिल्यानगर : संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात रिंगणात उतरतील, अशी जोरदार चर्चा होती. मात्र, विखे यांनी उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे थोरात यांचा सामना शिंदेसेनेचे अमोल खताळ यांच्याशी होईल.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस