मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ तर सांगलीत केवळ १ शॅडो मतदान केंद्र असणार आहे. राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये शॅडो मतदान केंद्रं असतील. या शॅडो मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी विशेष सुविधा असणार आहेत. यामध्ये विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर कार्यरत असतील. याशिवाय पर्यायी कम्युनिकेशन यंत्रणाही कार्यरत असेल. अनेक ठिकाणी मोबाईलची रेंज पोहोचत नाही. इंटरनेट किंवा अन्य संपर्क यंत्रणाही नसतात. त्याला शॅडो एरिया म्हणतात.
राज्यात ९१५ शॅडो मतदान केंद्र, सॅटेलाइट फोनही असणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 8:18 AM