शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, काँग्रेसने उगारला कारवाईचा बडगा; सहा बंडखोर निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2024 8:34 AM

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे.

 मुंबई - महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काँग्रेसच्या ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत त्या सर्व बंडखोरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना ६ वर्षांसाठी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहे. राज्यात कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केले आहे. गुरुवारी टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

बीकेसीतील महाराष्ट्र स्वाभिमान सभेत मविआने लोकसेवेची पंचसूत्री जाहीर केलेली आहे, त्याचा घरोघरी जाऊन प्रचार केला जाईल. १० नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल ग्रँड हयात येथे मविआचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरद पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत हे उपस्थित असतील, असेही चेन्नीथला यांनी सांगितले.

या बंडखोरांवर कारवाईराजेंद्र मुळक    रामटेकयाज्ञवल्क्य जिचकार    काटोल  जयश्री पाटील    सांगलीकमल व्यवहा    कसबाआबा बागुल    पर्वती मनीष आनंद    शिवाजीनगर  

‘भाजपने काँग्रेसविरोधात दिलेल्या जाहिराती खोट्या’काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश या राज्यात दिलेली आश्वासने पाळली नसल्याच्या आशयाची खोटी जाहिरात भाजपने दिल्याप्रकरणी काँग्रेसने गुरुवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची मंत्रालयात भेट घेतली आणि तक्रार दिली.

कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ज्या गॅरंटी जाहीर केल्या त्याची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, काँग्रेसने अंमलबजावणी केली नाही, अशा खोट्या जाहिराती भाजपने वर्तमानपत्रातून दिल्या आहेत. काँग्रेस विरोधात जाणीवपूर्वक अपप्रचार करुन जनतेची दिशाभूल केल्यामुळे निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे पवन खेरा यांनी सांगितले.

यूपीए सरकारने ७१ हजार कोटी रुपयांची शेतकरी कर्जमाफी केली होती, काँग्रेस पक्षाने हे करुन दाखवले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी जाहीर केलेल्या ५ गॅरंटी लागू करण्यात कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचे दिग्गज नेते उतरणार प्रचारात  काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले असून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेसचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागात जाहीर सभा घेणार असल्याचे चेन्नीथला यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी