नालासोपाऱ्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. बविआचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडेंना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. परंतू, जिल्हाधिकाऱ्यांनी आचारसंहिता असून पीसी घेऊ शकत नाही, असे सांगत पीसी रोखण्यात आली. यावरून पुन्हा वातावरण तापले होते. यावर हितेंद्र ठाकूर यांनी मला ५० एक फोन आले, प्रकरण मिटवा, असे सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.
सांगण्यासारखे काही आहे का, पैसे वाटप, बैठका करू शकतो का. पोलिसांनी पत्रकार परिषद का रोखली? कोणत्या आचारसंहितेत लिहिले की पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. निवडणूक आयोगाचे अधिकारी मला सांगतात हे आपल्याच आडवे येईल, भाजपाच्या, त्यांच्याकडे बोलण्यासाठी काही नव्हते, असे ठाकूर यांनी सांगितले.
माझ्यावर कोणाचा दबाव नाही. माल खूप आहे, मला ५० फोन केले, जे आहे ते संपवा मिटवा, आपण मित्रपक्ष आहोत, असे सांगितले गेले. मी सोडून दिले, असे ठाकूर म्हणाले. निवडणूक आयोग आणि पोलिसांवर प्रशासनाचा दबाव आहे. हे मिळाले ते पैसे माझे होते का, तावडेंनी किंवा नेत्याने ४८ तास आधी बाहेर जायचे होते. ते थांबले कसे. कुठल्या रुममध्ये ५ लाख, कुठल्या रुममध्ये दोन लाख, तीन लाख असे रुपये सापडले आहेत, ते निवडणूक आयोग आणि पोलीस अधिकाऱ्यांना विचारा, असा आरोप ठाकूर यांनी केला.
पोलिसांनी पत्रकार परिषद रोखताच ठाकुरांच्या बाजुला बसलेले विनोद तावडे उठून जाऊ लागले. यावेळी ठाकुरांनी तावडेंना थांबविले. विनोद तावडेंनीच आपल्याला एकत्र पत्रकार परिषद घेऊ असे सांगितले होते, असा आरोप क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. पोलीस डीसीपी घटनास्थळी आले असून तावडेंकडे काय काय सापडले याची तपासणी केली जाणार आहे.