शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
3
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
4
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
5
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
6
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
8
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
9
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
10
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
11
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
12
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
13
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
14
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
15
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
16
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
17
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
18
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
19
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
20
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार

महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2024 8:02 PM

मुंबई, कोकण, ठाणे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या पक्षांची स्वतःची राजकीय पकड आहे.

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थाने दमदार सुरुवात झाली आहे. सर्व पक्ष आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. दरम्यान, राज्यातील 288 जागांवर वेगवेगळी राजकीय समीकरणे आहेत. मुंबई, कोकण, ठाणे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची स्वतःची राजकीय पकड आहे. 

मुंबईचे समीकरण काय आहे ?मुंबई विभागात विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. मुंबई हा नेहमीच उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचे काही नुकसान झाले असेल, पण लोकसभा निवडणुकीत तीनपैकी दोन ठाकरे गटाचे खासदार निवडून आले. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंचे 15 आमदार मुंबईत होते. मात्र 2014 पासून भाजपने हळूहळू मुंबई काबीज केली. मुंबईत भाजपचेही 15 आमदार आहेत.

भाजपकडे आशिष शेलार, राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, अमित साटम, टिमल सेलवन, मनीषा चौधरी असे मोठे नेते आहेत. दुसरीकडे ठाकरे गटाकडे आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सुनील प्रभू, सुनील राऊत, रमेश कोरगावकर असे बडे नेते आहेत. मुंबईत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटात लढत आहे, तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. अमीन पटेल, अस्लम शेख, ज्योती गायकवाड, नसीम खान असे काँग्रेसचे चेहरेही रिंगणात उतरले आहेत. याशिवाय, नवाब मलिक, सना मलिकसारखे उमेदवार अजित पवार गटाकडून रिंगणात आहेत.

कोकणात कोणाची पकड जास्त ?महाराष्ट्राच्या कोकणात खासदार नारायण राणे यांची सत्ता असायची, पण आता कोकणात उद्धव ठाकरेंचा करिष्मा दिसू लागला आहे. अनेक वर्षांपासून कोकणात राणे आणि ठाकरेंमध्ये तगडी स्पर्धा लागते. कोकणात उद्धव गट आणि शिंदे गटात थेट लढत होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दीपक केसरकर, उदय सामंत यांच्यासारखे मंत्री आहेत, तर दुसरीकडे नीलेश राणे, किरण सामंत यांच्यासारखे बलाढ्य नेते आहेत. यावेळी एकनाथ शिंदे गटाची ताकद कोकणात पाहायला मिळेल.

ठाण्याचे राजकीय समीकरण?महाराष्ट्रातील ठाणे हा भाग पूर्वीपासून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. धर्मवीर आनंद दिघे यांच्यापासून ते एकनाथ शिंदेपर्यंत ठाण्यात शिंदे यांची प्रतिमा आहे. यावेळी संपूर्ण ठाण्यात शिंदे यांच्यासाठी लढत होणार आहे. ठाण्यात उबाठा विरुद्ध शिंदे गट लढणार आहे. एकनाथ शिंदे हे स्वतः ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीतून निवडणूक लढवणार आहेत. शिंदे यांच्यासोबतच प्रताप सरनाईक, भाजपचे रवींद्र चव्हाण, गणेश नाईक हे सर्वच ताकदीचे नेते आहेत, तर दुसरीकडे राजन विचारे, केदार दिघे यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक उद्धव ठाकरेंनी मैदानात उतरवले आहेत.

विदर्भात ताकदवान कोण?विदर्भात काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत आहे. 2014 पूर्वी विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी ती जागा आपल्याकडे ओढून आणली आहे. विदर्भात काँग्रेसच्या टीममध्ये नाना पटोले, विजय वड्डेटीवार, यशोमती ठाकूर, नितीन राऊत, सुनील केदार असे मोठे नावाजलेले चेहरे आहेत, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, अशा भाजप नेत्यांची तगडी फौज आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरण काय आहे?शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केल्यापासून पश्चिम महाराष्ट्रातत त्यांचीच पॉवर पाहायला मिळते. यावेळी बारामतीत अजित पवार आणि शरद पवार यांच्यात प्रतिष्ठेची लढाी आहे. अजित पवारांविरोधात पुतणे युगेंद्र मैदानात आहेत. याशिवाय, शरद पवार यांच्या गोटात ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यासह युगेंद्र पवार, रोहित पवार, रोहित पाटील अशी तरुण मंडळीही आहेत. या सगळ्याचं नेतृत्व सुप्रिया सुळे करत आहेत. 

मराठवाड्याची काय परिस्थिती?मराठवाड्यात पूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचा वरचष्मा असायचा. पण, आता शिंदे यांच्या बंडखोरीनंतर संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल या नेत्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आणि मराठवाड्याचे राजकारण बदलले. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर झाला, पण याचा सर्वाधिक फटका मराठवाड्यातील लोकसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध दिसून आला. उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात संघर्ष करावा लागत आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ठाकरे यांना मराठवाड्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांची जादू चालत नाही. आता विधानसभा निवडणुकीत काय होते, हे पाहणे महत्वाचे आहे.

उत्तर महाराष्ट्राचे राजकीय समीकरण काय आहे?उत्तर महाराष्ट्रात भाजपचे कमळ हळूहळू फुलताना दिसत आहे. भाजपचे ट्रबलशूटर गिरीश महाजन, एकनाथ शिंदे यांचे दादा भुसे आणि अजित पवारांचे छगन भुजबळ हे येथील ताकदवान नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रात शरद पवार आणि काँग्रेस पक्षापेक्षा ठाकरेंना मानणारा वर्ग जास्त आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या नेत्याचा पराभव करून ठाकरे यांचे खासदार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे येथे महायुतीला दणका देऊ शकतात.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस