शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 05:18 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: फडणवीस की शिंदे, कुणाची शक्यता?; शपथविधीचेही वेगवेगळे मुहूर्त चर्चेत

यदु जोशीमुंबई - महायुती सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण होणार, याची उत्सुकता कमालीची वाढली असून विविध चर्चांना सोमवारी उधाण आले. पुन्हा एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस या भोवतीच चर्चा फिरत आहे. शपथविधीचेही वेगवेगळे मुहूर्त सांगितले जात आहेत.

मुख्यमंत्रिपदाबाबत विविध तर्क दिले जात आहेत. भाजपला १३२ जागा मिळाल्या, त्यांचे चार सहयोगी पक्षांचे उमेदवारही आमदार झाले. एका अपक्ष आमदाराने आधीच भाजपला पाठिंबा दिला आहे. आमच्याकडे १४० हून अधिक आमदार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे. भाजपकडे इतके मोठे संख्याबळ असताना मुख्यमंत्रिपद त्यांनाच मिळेल आणि फडणवीस हेच राज्याचे नवे कर्णधार असतील, ही चर्चा सर्वाधिक आहे. असे असताना फडणवीस यांना भाजपचे लगेच राष्ट्रीय अध्यक्ष करणार, अशी अफवाही उठली आहे.

रा. स्व. संघाचे शताब्दी वर्ष २०२५ मध्ये आहे. अशावेळी मुख्यमंत्रिपद फडणवीस यांच्याकडेच असावे अशी संघाची तीव्र इच्छा असू शकेल. त्या दृष्टीनेही फडणवीस यांचे नाव घेतले जात आहे. तसे झाले तर एकनाथ शिंदेंचे काय, हा प्रश्नही चर्चेत आहे. शिंदे यांना मुख्यमंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा शिंदेसेनेच्या एका नेत्याने ‘लोकमत’कडे केला.

राजकीय वर्तुळातील चर्चा व तर्कवितर्क...

पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबईसह सर्व महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, तोवर शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी ठेवले जाईल आणि पुढची चार वर्षे फडणवीस मुख्यमंत्री राहतील, असा तर्कही फिरत आहे. मात्र, फडणवीस यांना आताच मुख्यमंत्री केले तरी महायुतीची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील कामगिरी उत्तमच असेल, उपमुख्यमंत्री म्हणूनही शिंदे या यशासाठी योगदान देऊ शकतात, असे भाजपमधील काही नेत्यांचे म्हणणे आहे. आधी फडणवीस यांना दोन वर्षे, नंतर शिंदे यांना दोन वर्षे आणि मग शेवटी अजित पवार यांना एक वर्ष मुख्यमंत्रिपद दिले जाईल, असेही बोलले जात आहे. सोबतच फडणवीस, शिंदे यांना अडीच अडीच वर्षे हे पद दिले जाईल, असा दावाही काही जण करत आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपद वा महत्त्वाचे केंद्रीय मंत्रिपद दिले जाऊ शकते. अशावेळी खा. श्रीकांत शिंदे हे राज्य मंत्रिमंडळात राहतील, असा तर्कही दिला जात आहे.

आमच्याकडे ‘फॉर्म्युला’ नाही - अजित पवार

मुख्यमंत्रिपदाचा कसलाही फॉर्म्युला आमच्याकडे नाही. माझी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. आता भाजपची नेता निवड होईल. त्यानंतर आम्ही तिघे एकत्र बसून वरिष्ठांशी चर्चा करीत राज्याला मजबूत स्थिर सरकार देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची स्थिती नाही. आम्ही तिघे एकत्र बसून स्थिर सरकार देऊ. विरोधी पक्षनेता होण्यासाठी लागणारे संख्याबळ विरोधकांकडे नाही. विरोधकांचा मानसन्मान ठेवण्याची पद्धत आम्ही कायम ठेवू. 

मुख्यमंत्री शिंदे यांचा आज राजीनामा!

एकनाथ शिंदे हे मंगळवारी राजभवनावर जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी दाट शक्यता आहे. राजीनामा दिल्यानंतर राज्यपाल हे शिंदे यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगतील. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीBJPभाजपा