शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
5
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
6
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
7
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
8
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
9
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
10
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
11
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
12
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
13
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
14
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
15
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
16
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
17
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
18
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
19
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
20
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती

सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 09:23 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: संख्याबळ पाहता भाजपाचे आमदार जास्त आहेत. एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणे आमच्या स्वभावात नाही असंही गोगावले यांनी मुख्यमंत्रि‍पदावरून सांगितले.

रायगड - मी सत्तेच्या बाहेर राहून काम करतो असं एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी चर्चा करताना सांगितले होते, परंतु आम्ही सर्वांनी आग्रह केला. तुम्ही सत्तेबाहेर राहून नव्हे तर सत्तेत राहून काम करायचा असं विधान शिवसेना नेते आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. 

रायगड येथील पत्रकार परिषदेत गोगावले म्हणाले की, आमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना सत्तेत राहण्याचा आग्रह केला. तेव्हा मला २ दिवस गावी जाऊन येऊ द्या, मला थोडं निवांत राहून विचारविनिमय करू द्यावा. आमच्या सगळ्यांचा आग्रह हा त्यांनी सत्तेत राहावा यासाठी आहे. उपमुख्यमंत्री कोण याबाबत आता काही सांगू शकत नाही. सर्वस्वी जबाबदारी आम्ही मुख्यमंत्र्‍यांवर सोपवली आहे. ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंद्य आहे. सत्तेच्या प्रक्रियेत साहेबांनी सहभागी व्हावं हेच आम्हाला वाटते असं त्यांनी स्पष्ट केले.

तसेच ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा त्यांनी शपथविधी कधी ठेवायचे हे ठरवणं गरजेचे असते, विश्वासात न घेता शपथविधी घेतला जातोय हे म्हणणं बरोबर नाही. दिल्लीला बैठक झाली, तेव्हा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अमित शाह, जे.पी. नड्डा तिथे काही तरी ठरल्याशिवाय अशी तारीख दिली जाणार नाही. ५ डिसेंबरला शपथविधी करायचा आहे, त्याची तयारीही आझाद मैदानावर सुरू आहे. त्यामुळे सगळ्यांना विश्वासात घेऊनच हे सगळं होतंय, कुणाला बाहेर ठेवलं जातंय हे म्हणणं चुकीचे आहे असंही भरत गोगावले यांनी म्हटलं.

दरम्यान, जे होईल ते चांगले होईल, आमच्या तिन्ही पक्षात कुठेही कटुता नाही. चांगल्याप्रकारे सरकार स्थापन होईल. संख्याबळ पाहता भाजपाचे आमदार जास्त आहेत. एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणे आमच्या स्वभावात नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी हसत हसत सांगितले, भाजपाचा मुख्यमंत्री करायचा असेल तर माझा काही अडथळा नाही ते जाहीर केलंय, त्यामुळे नाराजीच्या चर्चेला अर्थ नाही. राजकारणात कधी काय घडेल हे कुणी सांगू शकत नाही असंही भरत गोगावले यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस