शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 6:23 PM

महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर होत असलेल्या आरोपांबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.

Maharashtra Assembly Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ८६ पैकी केवळ १० जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर ७६ ठिकाणी शरद पवार यांचे उमेदवार पराभूत झाले आहेत. या पराभवामुळे महाविकास आघाडीलाही मोठा फटका बसला आहे. या निकालानंतर आता २४ तासांनी शरद पवार यांनी याबाबत भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएमवर होत असलेल्या आरोपांबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला आहे. शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसला केवळ ४९ जागांपर्यंतच  मजल मारता आली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक फटका हा काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. विधानसभा निकालावर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. एकीकडे मित्रपक्षांकडून ईव्हीएमवर आरोप होत असताना शरद पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

"यावेळी दोन एक टक्क्यांनी महिलांचं मतदान वाढलं हे आताच्या आकडेवारी दिसून येतं. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली. त्यात आम्हाला थोडसा लोकांचा अधिक विश्वास वाटत होता. त्या अधिक विश्वासामुळे जेवढं आक्रमक रितीने प्रचार करण्याचा प्रयत्न केला त्यापेक्षा अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती. मी राज्यात सर्व जिल्ह्यात फिरलो. तिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचेही उमेदवार होते. आमचा उमेदवार होता तिथे इतर पक्षाचे कार्यकर्ते राबत होते. सर्वांनी कष्ट केले. पण निकाल आमच्या विरोधात गेला," असं शरद पवार यांनी म्हटलं. 

“ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. पण, पैशाचा वापर आतापर्यंत असा कधी पहायला मिळाला नव्हता. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात," असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Sharad Pawarशरद पवारEVM Machineईव्हीएम मशीन