शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 03:42 PM2024-11-22T15:42:36+5:302024-11-22T15:46:29+5:30

Sharad Pawar: शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली. राज्यभरातून शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित होते.

Maharashtra Assembly Election Result 2024: What is Sharad Pawar's exit poll number? Orders not to leave the counting station till the end to ncp Candidates | शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

महाराष्ट्राच्या निवडणुकीचा भल्या भल्यांनी अंदाज लावला आहे. एक्झिट पोल करणाऱ्या कंपन्यांचे आकडेही आले आहेत. महायुतीची सत्ता येत असल्याचे हे आकडे सांगत आहेत. अशातच आता राज्याच्या राजकारणातील धुरंधर नेते शरद पवार यांनी आपला आकडा सांगितला आहे. 

शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची ऑनलाईन बैठक घेतली. राज्यभरातून शरद पवार राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत एक्झिट पोलवरही चर्चा करण्यात आली. यावेळी शरद पवारांनी या एक्झिट पोलचा लोड घेऊ नका, असा सल्ला आपल्या उमेदवारांना दिला. महाविकास आघाडीच्या १५७ जागा येतील असे पवार म्हणाले. 

जोवर निकाल लागत नाही तोवर मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, असा आदेशच पवारांनी आपल्या उमेदवारांना दिला आहे. जिंकल्यावर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबई गाठण्याची व्यवस्था करून ठेवा असेही पवारांनी म्हटले आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या आमदारांची राहण्याची व्यवस्था मविआकडून करण्यात आली आहे. 

शरद पवारांनी १५७ जागा सांगितल्याने उर्वरित जागा या महायुती, अपक्ष आणि इतर पक्षांना जाण्याचा अंदाज लावण्यात येत आहे. सत्तास्थापनेसाठी १४५ जागांची आवश्यकता आहे, त्यापेक्षा १२ जागा जास्त महाविकास आघाडीला मिळत असल्याचा दावा पवारांनी केला आहे. बहुतांश एक्झिट पोलनी महायुतीला बहुमत मिळले, त्यांची सत्ता येईल असे म्हटले आहे. यामुळे आता नेमके खरे कोणाचे हे उद्या २३ नोव्हेंबरलाच समजणार आहे.  

Web Title: Maharashtra Assembly Election Result 2024: What is Sharad Pawar's exit poll number? Orders not to leave the counting station till the end to ncp Candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.