शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 8:33 PM

Maharashtra School to Close on 18-19 november: मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे पत्र राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे. राज्य सरकारने ही अट ठेवल्याने पालकांना शाळेत विचारूनच मुलांना शाळेत पाठवावे लागणार आहे.

राज्यात निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळांचे शिक्षक निवडणूक कामात असणार असल्याने राज्य शासनाने ज्या शाळा या काळात शाळा भरवू शकत नाहीत त्या शाळांना सुट्टी जाहीर करून टाकली आहे. यामुळे दिवाळीनंतर लगेचच मोठ्ठा विकेंड चालून आला आहे. 

शासनाने राज्यातील शाळांचा 18 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. १५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने आधीच हॉलिडे आहे. शहरातील अनेक शाळांना शनिवारची सुट्टी असते, तर रविवारी आठवडा सुट्टी असते. यानंतर सोमवारी १८ तारखेपासून २० पर्यंत राज्य शासनाने सुट्टी जाहीर केली आहे. ज्या शाळांना शनिवारी सुट्टी नाही त्या शाळांनाच फक्त कामकाज करावे लागणार आहे. 

२० नोव्हेंबरला मतदान असल्याने राज्य सरकारने या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. यामुळे बऱ्याच पालकांना शनिवार, रविवार सुट्टी असून सोमवार आणि मंगळवारच फक्त कामाचे दिवस आहेत. यामुळे हे पालक दोन दिवस सुट्टी टाकून मोठी सुट्टी देखील घेण्याची शक्यता आहे. यामुळे मतदानावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे.

मोठ्या प्रमाणावर शाळांतील शिक्षक निवडणूक ड्युटीवर आहेत. यामुळे अनेक शाळा विद्यार्थी आले तरी त्यांना शिकवू शकत नाहीत. या शिक्षकांना आधीच मतदान केंद्रे नेमून दिलेली आहेत. त्यांना त्यांचे साहित्य ताब्यात घेऊन त्या मतदान केंद्रांवर पोहोचायचे आहे. बरीच तयारी बाकी आहे, यामुळे हे शिक्षक शाळेत येऊ शकत नाहीत. यामुळे ज्या ठिकाणी या कारणामुळे शाळा भरविता येणे शक्य नाही तिथे शासनाने शाळांना सुट्टी घेण्यास सांगितले आहे.

अशा ठिकाणच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात याव्यात असे पत्र राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे. राज्य सरकारने ही अट ठेवल्याने पालकांना शाळेत विचारूनच मुलांना शाळेत पाठवावे लागणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Schoolशाळाvidhan sabhaविधानसभा