आझाद समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली, त्यांना नक्कीच त्या ठिकाणी यश मिळेल असे खासदार चंद्रशेखर आझादांनी म्हटले आहे. नागपुरात दीक्षाभूमीवर नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात करणार असल्याचेही आझाद म्हणाले.
योगी, मोदींसह बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर आझाद म्हणाले की, हा नारा आमच्या कडूनच इकडे आला आहे. ज्यांनी नारा दिलाय त्यांना स्वत:चा प्रदेश सांभाळला जात नाहीय. आज प्रयागराजमध्ये युपीएससीचे पेपर होत नसल्याने लाखो तरुण तीन दिवसांपासून रस्त्यावर उतरलेले आहेत. केंद्र सरकार वन टाइम वन इलेक्शन यासाठी तयार आहे मात्र वन टाइम वन शिफ्टमध्ये पेपर घ्यायला सरकारची हिंमत नाही. नारा दिल्याने काम चालणार नाही तर जनतेचे काम करावे लागणार आहे तरच जनता मतदान करेल, असे आझाद म्हणाले.
महाराष्ट्र सध्या कोण कोणत्या पक्षासोबत जाईल आणि किती पक्ष तुटतील हे कोणी सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे. आम्ही आंबेडकर मुव्हमेंटचे लोक सर्वांसाठी काम करत असतो. मागच्या संघटनांमध्ये ज्या कमतरता होत्या त्या दूर करणार आहोत, असे आझाद म्हणाले. तसेच संविधानाचा विष्य पुढेही चालूच राहणार आहे. अन्याय अत्याचार समाप्त होणार नाही सर्वांना समानता हा नारा जोपर्यंत दिला जाणार नाही तोपर्यंत संविधानाचा मुद्दा कायम असेल, असे आझाद म्हणाले.