शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

Maharashtra Voting 2019 Live: संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राज्यभरात ५५.४८ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 7:05 AM

Maharashtra Election 2019 Live : Voting Update And News From Mumbai Pune, Aurangabad, Satara, Sangli, Baramati Constituency In Marathi | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक लाइव बातम्या

21 Oct, 19 05:54 PM

राज्यभरात संध्याकाळी ५ पर्यंत ५४.५५ टक्के मतदान

21 Oct, 19 05:33 PM

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी पुण्यात केलं मतदान

21 Oct, 19 05:15 PM

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान याने बजाविला मतदानाचा अधिकार

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने वांद्रे पश्चिम मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. 

21 Oct, 19 05:08 PM

लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी बजाविला मतदानाचा हक्क

लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी यवतमाळ येथील तहसील चौकस्थित जिल्हा परिषद शाळा (काटेबाई) मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

21 Oct, 19 04:50 PM

कर्तव्य बजावित महिला पोलिसाने दिली बाळाला आईची माया

तोंडात चांदीचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्या अनेकांना सत्तेचे बाळकडू आयतेच मिळते. तर कित्येकांचा उभा जन्म केवळ लोकशाहीच्या पायरीवर सेवा देण्यातच संपून जातो. सोमवारी मतदान केंद्रावर मतदार आपला अधिकार बजावण्यासाठी येत राहिले. लोकांना त्यांचा अधिकार निर्धोक बजावता यावा म्हणून पोलीस मात्र डोळ्यात तेल घालून जबाबदारी सांभाळत होते. यवतमाळातील  शिवाजी शाळा मतदान केंद्राबाहेर ड्यूटी बजावता-बजावता आपल्या पोटच्या गोळ्यालाही खेळवता-खेळवता कर्तव्याचे बाळकडू देणारी ही पोलीस महिला. (छाया - रूपेश उत्तरवार, यवतमाळ) 

21 Oct, 19 04:44 PM

लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा; केल्याने होत आहे रे...

मतदानाचा दिवस अनेकांना आयती सुटीच वाटते. धडधाकट माणसेही मतदान टाळतात. हे चित्र म्हणजे अशा माणसांसाठी चपराक ठरावी. दिव्यांगांनी भरभरुन मतदान तर केलेच. पण यवतमाळातील तहसील चौकातील नगरपरिषद शाळेतील मतदान केंद्रावर चक्क दिव्यांग कर्मचाऱ्याने मतदान केंद्र अधिकारी म्हणून दिवसभर आपले कर्तव्य उत्साहाने पार पाडले. (छाया - रूपेश उत्तरवार, यवतमाळ)

21 Oct, 19 04:16 PM

अचलपूरचे अपक्ष उमेदवार बच्चू कडू यांनी केलं मतदान

अमरावती : अंचलपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार बच्चू कडू यांनी बेलोरा येथे सपत्नीक मतदान केले

21 Oct, 19 04:14 PM

पुण्यात १०२ वर्षीय हाजी इब्राहिम यांनी कुटुंबीयांसह बजाविला मतदानाचा हक्क

पुण्यातील लोहेगाव येथे १०२ वर्षीय हाजी इब्राहिम अलीम यांनी त्यांच्या कुटुंबीयांसोबत केलं मतदान, गेल्या ४ दिवसांपासून ते आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत होते.  

21 Oct, 19 04:04 PM

राज्यात ३ वाजेपर्यंत ४३.७८ टक्के मतदान 

कोल्हापूरातील शाहुवाडी येथे ६२.६० टक्के, करवीर - ६५.६१ टक्के, हातकंणगले - ५२.३४, शिरोळ - ५२.७६, कोल्हापूर दक्षिण ५४.७१,  इस्लामपूर ५५.१२,  पळूस कडेगाव - ५६.२६ टक्के, शिराळा - ५७.४२ टक्के मतदान पार पडलं आहे. 
 
 

21 Oct, 19 03:56 PM

बारामतीतील कांबळेश्वर गावकऱ्यांची अनोखी शक्कल

बारामती परवा रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने मतदान केंद्राबाहेर चिखल साचला. कांबळेश्वर गावातील ही घटना होती. मतदान केंदावर ५५ टक्के मतदान झालं आहे. ट्रक्टरच्या सहाय्याने मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी पूल बनविला गेला. 

21 Oct, 19 03:50 PM

बॉलिवूडमधील बच्चन कुटुंबीयांनी बजाविला मतदानाचा अधिकार

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन, जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी जुहू येथील मतदान केंद्रावर मतदान केलं. 

21 Oct, 19 03:48 PM

अमरावती जिल्ह्यात दुपारी 3. पर्यंत 39.42 टक्के मतदान

36- धामणगाव रेल्वे - 38.4
37- बडनेरा -    35.92 टक्के
38- अमरावती - 33.66
39- तिवसा - 37.84
40- दर्यापूर - 42.23
41- मेळघाट - 45.3
42- अचलपूर - 44.43
43- मोर्शी - 40.08  टक्के
 

21 Oct, 19 03:40 PM

अभिनेता शाहरुख खानने बजाविला मतदानाचा अधिकार

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खानने वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजाविला 

21 Oct, 19 03:39 PM

भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओलने बजाविला मतदानाचा हक्क

गुरुदासपूरचे भाजपा खासदार आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओलने जुहू येथील मतदान केंद्रावर मतदान केलं 

21 Oct, 19 03:37 PM

गायिका नेहा राजपालने बजाविला मतदानाचा हक्क

21 Oct, 19 03:15 PM

शिरोलीत ९० वर्षीय आजीला नातवाने आणले मतदानाला

कृष्णाबाई इशवरा पाटील वय 90  शिरोली दुमाल येथे नातू शिवाजी सुतार याने असे उचलून आणले.

21 Oct, 19 02:56 PM

कोल्हापूरात लहान बाळासह महिलेने बजावला मतदानाचा हक्क

करवीर तालुक्यातील शिरोळ दुमाल येथे दुपारी 3 पर्यंत 58 टक्के मतदान केले गेले, यावेळी तरुणाईसह अनेक वयोवृध्द लोकांनी मतदान केले

21 Oct, 19 02:55 PM

दुपारी २ वाजेपर्यंत राज्यभरात ३६.२८ टक्के मतदान

राज्यभरात २८८ मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. सर्वाधिक मतदान गोंदियामध्ये ४०.४१ टक्के तर गडचिरोलीमध्ये ४०.१९ टक्के मतदान पार पडलं आहे. 

नंदूरबार - ३७.७४ टक्के, धुळे - ३१.७९ टक्के, जळगाव - २६.२८ टक्के, बुलडाणा - ३१.०२ टक्के, अकोला - २८.४९ टक्के, वाशिम - ३४.७१ टक्के, अमरावती - २७.९१ टक्के, नागपूर - ३४.६९ टक्के, भंडारा - ३६.११ टक्के, चंद्रपूर - ३४.५९ टक्के, मुंबई - २७.६८ टक्के, मुंबई उपनगर - २७.६८ टक्के, ठाणे - २३.४५ टक्के, पुणे - २९. ०५ टक्के, सातारा ३२.३७ टक्के, कोल्हापूर ३९.०१ टक्के, सांगली ३३.९१ टक्के, पालघर - ३३.९२ टक्के मतदान झालं आहे. 

21 Oct, 19 02:41 PM

यवतमाळ जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी 33.19 टक्के मतदान

 वणी – 34.92 टक्के
राळेगाव – 34.4 टक्के
यवतमाळ – 26.69 टक्के
दिग्रस – 36.72 टक्के
आर्णि – 34.36 टक्के 
पुसद – 33.44 टक्के
उमरखेड – 33.46 टक्के
 

21 Oct, 19 02:25 PM

जळगाव-वरणगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 216 मधील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे.

जळगाव-वरणगाव येथील मतदान केंद्र क्रमांक 216 मधील ईव्हीएम मशीन बंद पडले आहे.

21 Oct, 19 02:00 PM

अमरावतीमध्ये 15.21 टक्के मतदान

सकाळी 11 पर्यंत मतदान टक्केवारी

36- धामणगाव रेल्वे - 12 
37- बडनेरा - 18 टक्के
38- अमरावती - 15.22
39- तिवसा - 12
40- दर्यापूर - 11.25
41- मेळघाट - 29.32
42- अचलपूर - 16.3
43- मोर्शी - 8 टक्के


(जिल्हा सरासरी : 15.21 टक्के)

21 Oct, 19 01:14 PM

मुंब्रामध्ये ईव्हीएम बिघडले; लांबपर्यंत रांगा

ठाणे - मुंब्रा कळवा मतदार संघात  मतदान केंद्र रेती बंदर मधील कैवल्य शाळा मधील मतदान यंत्र बंद पडले होते. अखेर एक तासा नंतर मशीन दुसरे बसविण्यात आले, परंतु परत दुसरे मशीन बसविल्या नंतर पुन्हा 15 मिनिटांचा कालावधी गेला. त्यामुळे मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

21 Oct, 19 01:13 PM

निवडणूक कर्तव्यावर असताना शिक्षकाचा मृत्यू

गडचिरोली : एटापली तालुक्यातील पुरसुलगोंदी येथील अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पायी जाताना भोवळ येऊन पडल्याने एका शिक्षकाचा मृत्यू, मतदानाच्या कामात लागली होती ड्युटी

21 Oct, 19 01:12 PM

सावंतवाडीत गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

21 Oct, 19 01:05 PM

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी केले मतदान

ठाणे लोकसभा शिवसेनेचे खासदार राजन विचारे तसेच त्यांच्या पत्नी ठाणे महापालिकेच्या नगरसेविका नंदिनी विचारे व त्यांच्या दोन मुली लतिषा विचारे व धनश्री विचारे यांनी बजावला मतदानाचा हक्क.

21 Oct, 19 12:45 PM

महिला मतदारांचा मतदान केंद्राच्या व्हरांड्यात ठिय्या

नांदेपेरा येथील मतदान यंत्र बंद पडल्याने महिला मतदारांनी मतदान केंद्राच्या व्हरंड्यात ठिय्या दिला

21 Oct, 19 12:26 PM

रामदास आठवलेंनी बजावला मतदानाचा हक्क

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सपत्नीक वांद्रे पूर्व एमआयजी कॉलनी येथील नवजीवन शाळे मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.

21 Oct, 19 12:24 PM

रत्नागिरी जिल्ह्यात मतदान वाढले; राजापूरमध्ये सर्वाधिक

रत्नागिरी - जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत २३.३६ टक्के मतदान. सर्वाधिक २५.४ टक्के मतदान राजापूर मतदार संघात.

21 Oct, 19 12:22 PM

मला 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल; चंद्रकांत पाटलांचा दावा

पुणे निवडणूक 2019 : मला 1 लाख 60 हजारच्या मताधिक्य मिळेल

 

21 Oct, 19 12:09 PM

इव्हीएम घेवून कर्मचाऱ्यांची पाच कि.मी.पायपीट

नंदुरबार- अक्कलकुवा मतदार संघातील त्रीशूल मोंजरापाडा येथे इव्हीएम बंद पडले. पर्यायी इव्हीएम घेवून कर्मचाऱ्यांची पाच कि.मी.पायपीट. मतदान आता सुरळीत चालू आहे.

21 Oct, 19 12:09 PM

मुंबई शहर जिल्ह्यामध्ये सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 % टक्के मतदान.

मुंबई शहर जिल्ह्यामध्ये सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 % टक्के मतदान.

21 Oct, 19 12:06 PM

डॉ अनिल काकोडकर यांनी केले मतदान

ज्येष्ठ अणू शास्त्रज्ञ व निवडणूक आयोगाचे ब्रँड एम्बेसेडर डॉ अनिल काकोडकर यांनी ठाणे येथील एलआयसी मंडल कार्यालय मतदान केंद्रावर आपला हक्क बजावला.

 

21 Oct, 19 12:05 PM

राज्यभरात मतदारांचा निरुत्साह? सकाळी 11 वाजेपर्यंत केवळ सरासरी 15 टक्केच मतदान

अमळनेर विधानसभा मतदार संघात सकाळी  11 पर्यंत 19.42 % मतदान

भुसावळ: ११ वाजेपर्यंत ९.९ टक्के मतदान

अकोला : अकोला जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत सरासरी १६.५८ टक्के मतदान

बुलडाणा जिल्हा सकाळी 11 वाजेदरम्यान आकडेवारी
21 मलकापूर - 14.78
22 बुलडाणा - 15.15
23 चिखली - 15.30
24 सिंदखेड राजा -  16.41
25 मेहकर - 16.05
26 खामगांव-  17.98
27 जळगांव जामोद - 15.71
एकूण - 15.91

 मुंबई सकाळी ११ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

भायखळा १४.८७%
शिवडी १४.०८ %
वरळी १४.२५ %

 

21 Oct, 19 11:52 AM

मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 टक्के मतदान.

मुंबई शहर जिल्हा सकाळी 7 ते 11 या दरम्यान सरासरी 13 टक्के मतदान.

21 Oct, 19 11:52 AM

सांगली : सांगलीवाडी येथे मतदान केंद्राच्या आवारात पाण्याचे तळे साचले आहे.

21 Oct, 19 11:45 AM

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले सहकुटुंब मतदान

21 Oct, 19 11:37 AM

काँग्रेसच्या उमेदवाराकडून खामगाव पोलिसात तक्रार; भाजपाकडून बुथ कॅप्चरिंग होत असल्याचा आरोप

शहरातील भाजपाकडून बुथ कॅप्चरिंग होत असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी काँग्रेसचे उमेदवार ज्ञानेश्वर पाटील, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व त्यांचे समर्थक शहर पोलीस स्टेशनला दाखल.

21 Oct, 19 11:35 AM

अकोल्यात मतदान केंद्रावर काँगेस उमेदवार साजीद खान पठाण आणि पोलिसांत शाब्दिक चकमक.

अकोला: अकोल्यात मतदान केंद्रावर काँगेस उमेदवार साजीद खान पठाण आणि पोलिसांत शाब्दिक चकमक.

21 Oct, 19 11:33 AM

पुसदमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, मतदान केंद्रावर शुकशुकाट

21 Oct, 19 11:33 AM

मुक्ताईनगर मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९ टक्के मतदान

 मुक्ताईनगर मतदार संघात सकाळी ११ वाजेपर्यंत १९ टक्के मतदान

21 Oct, 19 11:24 AM

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले मतदान

नांदेड: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सकाळी ७.३० च्या सुमारास शहरातील आंबेडकर नगरमधील मनपा शाळा येथील मतदान केंद्रावर मतदान केले. यावेळी पत्नी अमिता चव्हाण व कार्यकर्ते.

21 Oct, 19 11:19 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले मतदान

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी साखराळे (ता. वाळवा) येथे पत्नी शैलजा, पुत्र राजवर्धन आणि प्रतीक यांच्यासोबत मतदान केले.

 

21 Oct, 19 11:13 AM

माजिवडा विधानसभा मतदार संघ मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे केले मतदान

ओवळा - माजिवडा विधानसभा मतदार संघ मनसेचे उमेदवार संदीप पाचंगे यांनी परिवारासह मतदानाचा हक्क वर्तकनगर येथील थिराणी शाळेत बजावला.

21 Oct, 19 11:06 AM

सोलापूर शहरात सव्वा टक्के मतदान

सोलापूर जिल्हयातील मतदार संघ निहाय सकाळी 9 वाजे पर्यंत ची मतदानाची टक्केवारी

करमाळा- 6.85%
माढा- 3.4%
बार्शी- 2.93%
मोहोळ- 2.39%
सोलापूर शहर उत्तर-2 %
सोलापूर शहर मध्य 2.69%
अक्कलकोट- 3%
सोलापूर उत्तर- 1.15%
पंढरपूर  3.19%
सांगोला- 5.9%
माळशिरस- 3.96%

21 Oct, 19 11:05 AM

रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी बजावला मतदानाचा हक्क

21 Oct, 19 11:02 AM

मतदार माघारी फिरले

खेड आळंदी विधानसभा मतदार संघातील वाकी बुद्रुक गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारगोटे शिवार येथील मतदान केंद्र क्र.229 येथील मशीन 1 तास लेट सुरु झाले. 

21 Oct, 19 10:55 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला सपत्नीक मतदानाचा अधिकार

21 Oct, 19 10:52 AM

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा अधिकार

21 Oct, 19 10:38 AM

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी मतदान केले

21 Oct, 19 10:34 AM

शिवसेनेचा राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे मतदान

21 Oct, 19 10:34 AM

डाॅ. परिणय फुके यांनी केले मतदान

भंडारा : पालकमंत्री  तथा साकोली मतदारसंघाचे भाजप उमेदवार डाॅ. परिणय फुके यांनी भंडारा शहरातील भगिरथ भास्कर विद्यालयात मतदान केले.

21 Oct, 19 10:05 AM

अकोल्यामध्ये सकाळी ९ वा. पर्यंतचे मतदान

अकोला: 
सकाळी ९ वा. पर्यंतचे मतदान
२८-अकोट-             ५.२७%
२९-बाळापूर-            ५.०९%
३०-अकोला पश्चिम-   ४.४९%
३१-अकोला पूर्व-       ५.१९%
३२-मूर्तिजापूर-          ५.०४%

21 Oct, 19 10:04 AM

नवी मुंबई- ऐरोली मतदार संघात 12 टक्के मतदान

नवी मुंबई- ऐरोली मतदार संघात 12 टक्के मतदान

21 Oct, 19 10:04 AM

काँग्रेसचे उमेदवार अशोक जाधव यांनी मतदान केले

अंधेरी पश्चिम विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार अशोक जाधव यांनी वर्सोवा लिंक रोड येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील केंद्रावर जाऊन मतदान केले.

21 Oct, 19 10:00 AM

सरासरी 4 ते 5 टक्केच मतदान

ठाणे - पहिल्या 2 तासात ठाणे शहर आणि कोपरी पाचपाखाडीमधे सुमारे 6 टके मतदान. तर ओवला माजीवडा मधे 5.93 टके मतदानची नोंद.

चोपडा मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 3.97% मतदान.

कळवा मुंब्रा मधे - 4.83 टके मतदान.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६४ टक्के मतदान.

मुंबई शहर जिल्हा सकाळी सात ते नऊ या दरम्यान सरासरी पाच टक्के मतदान.

कल्याण पश्चिम : 6.60% मतदान

कल्याण पूर्व मतदारसंघात ८.३४ टक्के मतदान

बीड जिल्हा : सकाळी 9 वाजेपर्यंत 3.24 टक्के मतदान

नाशिक- कळवण - सुरगाणा मतदार संघात 7 ते  9 या दोन तासात  8.74%. मतदान

नाशिक-  नाशिक पश्चिम मतदार संघात सकाळी 7-9 यावेळच्या  3.6% टक्के मतदान

जळगाव - जळगाव शहर मतदार संघात सकाळी 9 वाजेपर्यंत 2.14 % मतदान

ठाणे जिल्ह्यात 4.83 टक्के मतदान

सांगली जिल्ह्यात सकाळी नऊपर्यंत ३.८१ टक्के मतदान

पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये सकाळी 9.00 वाजेपर्यंत 5.13% मतदान 

शिरपूर 9 टक्के, धुळे 2.5 टक्के, सिंदखेडा 6.78 टक्के, धुळे ग्रमीणमध्ये 4.74 टक्के मतदान.

रावेर विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.७३ टक्के मतदान

पाचोरा विधानसभा मतदार संघात सकाळी  9 पर्यंत 3.40 टक्के मतदान

उल्हासनगरात सकाळी 9 वाजे पर्यंत फक्त 2.5 टक्के मतदान

 

21 Oct, 19 09:28 AM

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मतदान केंद्रावर दाखल

21 Oct, 19 09:50 AM

मतदान केंद्राबाहेर चिखल झाल्याने पोलिसाने दिला ज्येष्ठ नागरिकाला आधार

जळगाव - जळगावात रात्रीपासून  तुरळक पाऊस होत होता. त्यामुळे अनेक मतदान केंद्राबाहेर चिखल झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाला आधार देतांना पोलीस.

21 Oct, 19 09:42 AM

बहिष्काराचे पडसाद

पालघर:-जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात होणाऱ्या वाढवण बंदराच्या विरोधात किनारपट्टी वरील अनेक गावाने घोषित केलेल्या बहिष्काराचे पडसाद उमटू लागले असून सकाळी 9  वाजेपर्यंत अनेक मतदान केंद्रात एकही मतदान झालेले नाही. तर  काही गावांमध्ये ग्रामस्थांनी पक्षाचे बूथच टाकून दिले नसल्याने हे बहिष्काराचे लोण हळूहळू किनारपट्टी भागात पसरत चालले आहे

21 Oct, 19 09:41 AM

ठाणे - पहिल्या 2 तासात ठाणे शहर आणि कोपरी पाँचपखडी मधे सुमारे 6 टके मतदान तर ओवला माजीवडा मधे 5.93 टके मतदानची नोंद

21 Oct, 19 09:28 AM

कल्याण पूर्व मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार गणपत गायकवाड यांनी आपल्या कुटुंबियांसह बजावला मतदानाचा हक्क

21 Oct, 19 08:58 AM

डॉ. पंकज भोयर यांनी वर्ध्यामध्ये केले मतदान

वर्धा येथील भाजप उमेदवार डॉक्टर पंकज भोयर यांनी कुटुंबासह वसंत प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान केले.

21 Oct, 19 08:57 AM

नाशिकमध्ये दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. काहीवेळाने पुन्हा मतदान सुरू.

नाशिकमध्ये दोन ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडली. काहीवेळाने पुन्हा मतदान सुरू.

21 Oct, 19 08:54 AM

दहिसर विधानसभा मतदार संघात उमेदवार मनिषा चौधरी यांनी मतदान केले.

दहिसर विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार मनिषा चौधरी यांनी आपल्या कुटुंबांसह मतदानाचा हक्क बजाविला.

21 Oct, 19 08:53 AM

अमळनेरचे भाजप उमेदवार शिरीष चौधरी यांनी कुटुंबासह मतदान केले

21 Oct, 19 08:52 AM

किशोर पाटील यांनी पाचोरा येथे मतदान केले

जळगाव - पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा येथील एस एस एमएम कॉलेजच्या मतदान केंद्रात सहपरिवार मतदान केले.

 

21 Oct, 19 08:50 AM

राधाकृष्ण विखे पाटलांचे सहकुटुंब मतदान

21 Oct, 19 08:49 AM

चोंडी गावात पालकमंत्री राम शिंदे तसेच ग्रामस्थांनी मतदान केले.

चोंडी गावात पालकमंत्री राम शिंदे तसेच ग्रामस्थांनी मतदान केले.

21 Oct, 19 08:48 AM

उदयनराजे भोसले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

सातारा - उदयनराजे भोसले, दमयंतीराजे आणि कल्पनाराजे भोसले यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.

21 Oct, 19 08:43 AM

भुसावळ (जळगाव): कुर्‍हा पानाचे येथे व्हीव्हीपॅटला कागद चिटकत असल्यामुळे मतदान बंद पडले आहे.

भुसावळ (जळगाव): कुर्‍हा पानाचे येथे व्हीव्हीपॅटला कागद चिटकत असल्यामुळे मतदान बंद पडले आहे.

21 Oct, 19 08:43 AM

विश्वनाथ भोईर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

कल्याण : कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क.

21 Oct, 19 08:41 AM

सोलापूर : भवानी पेठ मतदान केंद्रांमध्ये पावसाचं पाणी शिरलं.

21 Oct, 19 08:40 AM

कल्याण : कल्याण ग्रामीणचे मनसे उमेदवार प्रमोद(राजू)पाटील यांनी परिवारासहित केले मतदान.

कल्याण : कल्याण ग्रामीणचे मनसे उमेदवार प्रमोद (राजू) पाटील यांनी परिवारासहित केले मतदान.

21 Oct, 19 08:39 AM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी रांगेत उभे राहून मतदान केले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या कुटुंबीयांनी रांगेत उभे राहून बजावला मतदानाचा हक्क

21 Oct, 19 08:37 AM

अजित पवार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

पवार कुटंबाने आज सकाळी बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे मतदान केले. यावेळी अजित पवार यांच्यासह त्यांच्या डावीकडून भावजय शर्मिला पवार, आई आशा पवार, बहीण नीता पाटील, पत्नी सुनेत्रा पवार, बंधू निवास पवार, मुलगा जय पवार, पुतणे यजुवेन्द्र पवार यांनी मतदान केले. 

21 Oct, 19 08:23 AM

खासदार मनोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क

खासदार मनोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क

21 Oct, 19 08:22 AM

किशोर तिवारी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघात पांढरकवडा येथे मतदान केले

यवतमाळ : वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आर्णी विधानसभा मतदारसंघात पांढरकवडा येथे मतदान केले. भाजपचा राजीनामा देऊन ते अलीकडेच शिवसेनेत गेले.

21 Oct, 19 08:21 AM

गोरेगावच्या भाजपच्या उमेदवार विद्या ठाकूर यांनी कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

21 Oct, 19 08:21 AM

बेलापूर मतदार संघाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी केले मतदान

नवी मुंबई - बेलापूर  मतदार संघाचे उमेदवार मंदा म्हात्रे आणि त्यांच्या परिवाराने केले मतदान.

21 Oct, 19 08:20 AM

माजी आमदार नरसय्या आडम मास्तर मतदानाचा हक्क बजावला

21 Oct, 19 08:19 AM

उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी बजावला मतदानाचा हक्क

21 Oct, 19 08:18 AM

रणधीर सावरकर यांनी सहपरिवार मतदान केले.

अकोला: भाजपचे अकोला पूर्व मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर यांनी  पलसो बढे येथे सहपरिवार मतदान केले.

21 Oct, 19 08:17 AM

सोलापुरातील विनायकनगर परिसरात मतदान केंद्रावर पावसाच्या पाण्याने भरलेला परिसर

21 Oct, 19 08:13 AM

लातूरमध्ये मतदानावर पावसाचे सावट

लातूर : रात्रभर झालेल्या पावसाने अद्यापि विराम घेतलेला नाही. त्यामुळे मतदानाला पहिल्या टप्प्यात गती नाही. आभाळ भरून आलेले आहे, दिवसभर पावसाचे चिन्हे आहेत, परिणामी मतदानाचा टक्का घसरण्याची भीती आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी रिक्षा व अन्य वाहनांची यंत्रणा वाढवली आहे. शहरातील मतदारांना बाहेर काढण्याची कसरत उमेदवारांना करावी लागणार आहे.

21 Oct, 19 08:13 AM

महायुतीचे उमेदवार आशिष शेलार यांनी केले मतदान

21 Oct, 19 08:10 AM

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यातील पळसोबढे येथे मतदान केले

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यातील पळसोबढे येथे मतदान केले

21 Oct, 19 08:08 AM

रवींद्र वायकर यांनी मतदानाचा हक्क बजावला

राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री व जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघाच महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला.

21 Oct, 19 08:07 AM

अहमदनगर: आमदार संग्राम जगताप यांनी बजावला मतदानाचा हक्क

21 Oct, 19 08:05 AM

जळगाव : रावेर मतदार संघातील काँग्रेस उमेदवार शिरीष चौधरी यांनी सहकुटुंब मतदान केले.

21 Oct, 19 07:56 AM

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मतदान केले

डोंबिवली: राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सपत्नीक डोंबिवलीच्या स. वा. जोशी विद्यालयात जाऊन प्रथम मतदान केले.

21 Oct, 19 07:54 AM

विलेपार्ले विधानसभेचे भाजपा उमेदवार पराग अळवणी यांचे सहकुटुंब मतदान

विलेपार्ले विधानसभेचे भाजपा उमेदवार अँड.पराग अळवणी यांनी आज सकाळी 7.30 वाजता विलेपार्ले (पूर्व) येथील डहाणूकर कॉलेजच्या मतदान केंद्रावर जाऊन कुटुंबासह मतदान केले.

21 Oct, 19 07:53 AM

तळोजा येथे आमदार बाळाराम पाटील यांनी मतदान केले

 

21 Oct, 19 07:52 AM

अंबरनाथ मतदारसंघामध्ये दोन ईव्हीएम बंद

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातील बुवा परिसरात मतदानाचे दोन यंत्र बंद पडल्याने मतदारांमध्ये नाराजी सुरूवातीपासूनच मतदान यंत्र सुरू न झाल्याने मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर एक यंत्र सुरू करण्यात आले आहे तर दुसरे यंत्र अद्यापही बंद आहे. एका बुथवर मतदान सुरळीत सुरू झाले आहे, तर दुसरा बुथ वरील मतदान यंत्रांना तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहेत.

21 Oct, 19 07:50 AM

धुळे : शिरपूर शहरातील ब्रमटेक भागातील मतदान क्रमांक 223 व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्यामुळे मतदान 40 मिनिटे उशिरा, शेवटी मशिन बदलण्यात आले.

धुळे : शिरपूर शहरातील ब्रमटेक भागातील मतदान क्रमांक 223 व्हीव्हीपॅट नादुरुस्त झाल्यामुळे मतदान 40 मिनिटे उशिरा, शेवटी मशिन बदलण्यात आले.

21 Oct, 19 07:48 AM

मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आमदार किसन कथोरे यांनी सपत्नीक मतदानाचा अधिकार बजावला

21 Oct, 19 07:46 AM

पनवेल विधानसभा मतदार संघ भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी बजावला मतदानाचा हक्क.

21 Oct, 19 07:44 AM

अकोला: तळेगाव बाजार येथील बुथ ८८ वरील इव्हीएम मशिनमध्ये बिघाड.

अकोला: तळेगाव बाजार येथील बुथ ८८ वरील इव्हीएम मशिनमध्ये बिघाड.

21 Oct, 19 07:40 AM

ऐरोली मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार गणेश नाईक केले मतदान

नवी मुंबई - ऐरोली मतदार संघाचे उमेदवार गणेश नाईक केले मतदान

21 Oct, 19 07:08 AM

सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची भीती

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान; 154 उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत होणार बंद. मध्यरात्रीपासून सोलापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस; आताही जोरदार पाऊस सुरूच आहे. सोलापूर शहरातील 36 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. 

काल रात्रभर आणि आणि पहाटेपासून सोलापूर आणि परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे मतदानावर पाणी फिरतो की काय अशी स्थिती असली तरी लोकांमध्ये उत्साह आहे. सुरुवातीच्या काळात थोड्या संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू होत असल्याचे चित्र आहे अनेक मतदान केंद्रावर बुथ एजंटचा पोहोचले नाहीत. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही मिनिटे उशिरा सुरू झाली आहे.

21 Oct, 19 07:32 AM

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी वरळीमध्ये मतदान केले

21 Oct, 19 07:19 AM

यवतमाळ येथे 82 वर्षाच्या महिलेचे सर्वात पहिले मतदान

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Assembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMNSमनसेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूकbaramati-acबारामतीnashik-central-acनाशिक मध्यnashik-east-acनाशिक पूर्वsatara-acसाताराsangli-acसांगलीkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणworli-acवरळी